Pune Police | पुणे शहर पोलीस दलातील तीन पोलीस कर्मचारी तडकाफडकी निलंबित

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – मुंढव्यातील हॉटेल मेट्रोमध्ये दारूच्या नशेत झिंगलेल्या पुणे शहर पोलिस (Pune Police) दलातील 3 पोलिस कर्मचार्‍यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या आदेशावरुन अपर पोलीस आयुक्त प्रशासन डॉ. जालिंदर सुपेकर यांनी तीन पोलीस कर्मचाऱ्यांच्या निलंबनाचे आदेश मंगळवारी (दि.22) काढले आहेत. या तीन पोलीस कर्मचाऱ्यांवर (Pune Police) मुंढवा पोलिस ठाण्यात (Mundhwa Police Station) भा.द.वि कलम 323, 504, 506 सह मुंबई दारूबंदी अधिनियम कलम –85(1) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

पुणे वाहतूक शाखेत कार्यरत असणारे पोलीस नाईक अमित सुरेश जाधव, चंदननगर पोलीस ठाण्यातील पोलीस अंमलदार योगेश भगवान गायकवाड, फरासखाना पोलीस ठाण्यातील उमेश मरीस्वामी मठपती अशी निलंबित करण्यात आलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांची (Pune Police) नावे आहे. या कारवाईमुळे पुणे पोलीस दलात खळबळ उडाली आहे.

 

आदेशात नमूद केले आहे की, कायद्याचे ज्ञान असताना देखील मद्यापान करुन सर्वजनीक ठिकाणी पोलीस खात्याची प्रतिमा मलिन होईल असे बेशिस्तीचे, बेजबाबदारपणाचे, बेफिकीरीचे गैरवर्तन केले आहे. त्यामुळे मुंबई पोलीस (शिक्षा व अपिले) नियमांतर्गत सेवेतून निलंबित करण्यात येत आहे.

 

निलंबन काळात कोणत्याही प्रकारची खजगी नोकरी किंवा व्यवसाय करता येणार नाही.
याबाबतचे प्रमाणपत्र देऊन निर्वाह भत्त्याची रक्कम स्वीकारावी लागेल, असे आदेशात नमूद केले आहे.
तसेच निलंबन काळात मुख्यालय सोडून जायचे असेल तर अपर पोलीस आयुक्त प्रशासन व
पोलीस उप आयुक्त मुख्यालय यांची परवानगी घ्यावी लागेल.

 

 

Web Title :- Pune Police | Three police personnel of the Pune City Police Force have been summarily suspended

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा