Rohit Pawar | ‘… तर माफी मागायच्या लायकीचा सुद्धा ठेवणार नाही’ – रोहित पवार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेदरम्यान वि. दा. सावरकरांवर केलेल्या भाष्यावर वाद निर्माण झाले. त्यावर भाजप प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी प्रतिक्रिया देत नवा वाद निर्माण केला होता. त्यामुळे त्यांनी सर्व शिवप्रेमी आणि शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राची माफी मागावी, अशी मागणी अनेक संघटना आणि नेत्यांनी केली होती. त्यावर आता रोहित पवार (Rohit Pawar) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. शिवाजी महाराजांनी दिल्ली हादरवून ठेवली होती. त्याच दिल्लीत बसून भाजपचा एक प्रवक्ता म्हणतो, शिवाजी महाराजांनी माफी मागितली होती. तू एकदा महाराष्ट्रात ये, तुला माफी मागण्याच्या लायकीचा सुद्धा ठेवणार नाही, असा इशारा रोहित पवार (Rohit Pawar) यांनी दिला आहे.

 

छत्रपती शिवाजी महाराज आणि महात्मा फुले यांच्यावर अलिकडच्या काळात आक्षेपार्ह बोलले गेले आहे. शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहेत. त्यामुळे या गोष्टीचा भाजपाच्या कोणत्याही व्यक्तीने किंवा नेत्याने निषेध केला नाही. शिवाजी महाराजांनी दिल्ली हादरवून ठेवली होती. त्या दिल्लीत बसून भाजपाचा प्रवक्ता म्हणतो, शिवाजी महाराजांनी माफी मागितली होती. अरे एकदा महाराष्ट्रात ये, तुला माफी मागायच्या लायकीचासुद्धा ठेवणार नाही, असे रोहित पवार (Rohit Pawar) सुधांशू त्रिवेदी यांना उद्देशून म्हणाले आहेत.

 

राहुल गांधींनी सावरकरांच्या माफिनाम्यावर बोट ठेवल्यावर हा वाद निर्माण झाला होता. त्यावर सुधांशू त्रिवेदी यांनी एका हिंदी वाहिनीला मुलाखत दिली होती. यावेळी ते म्हणाले, राहुल गांधींनी वीर सावरकरांच्या माफीनाम्याचा मुद्दा उपस्थित केला. पण, आधीच्या काळात अनेक लोक सुटकेसाठी माफी मागत होते. छत्रपती शिवाजी महाराजांनी देखील माफी मागितली होती.

आधीच राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी शिवाजी महाराज हे जुन्या काळातील नायक झाले आहेत.
आता नवीन नायक भारतात तयार झाले आहेत, असे म्हंटले होते. त्यात सुधांशू त्रिवेदी यांनी भर घातली.
त्यामुळे सर्व भाजपेत्तर पक्ष राज्यपाल कोश्यारी आणि त्रिवदेंना पक्षातून हटविण्याची मागणी करत आहेत.
तसेच अनेक ठिकाणी निषेध आंदोलन देखील करण्यात आले आहे.

 

Web Title :- Rohit Pawar | rohit pawar attacks sudhanshu trivedi over chhatrapati shivaji maharaj statement

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

UGC 4 Year Graduation Program | युजीसीचा मोठा निर्णय ! आता 12 वी नंतर डिग्रीसाठी 4 वर्ष लागणार

Social Media Influencer Rohit Bhati | सोशल मीडिया स्टार रोहित भाटीचा भीषण अपघातात मृत्यू

Vinayak Raut | शिंदे सरकारने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची क्रूर चेष्टा करतंय; उद्धव ठाकरे शेतकरी संवाद मेळावा घेणार – विनायक राऊत