Pune Political News | पुण्यातील भाजप नगरसेविकेच्या पतीचा राष्ट्रवादी पक्षात प्रवेश; BJP ला पहिला धक्का (व्हिडीओ)

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Political News | आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या (Pune Municipal Elections 2022) तोंडावर भाजप नगरसेविकेच्या (BJP Corporator) पतीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात (NCP) प्रवेश केला आहे. त्यामुळे पुण्यातील (Pune Political News) सत्ताधारी भाजपला पहिला धक्का बसला आहे. वडगाव शेरी मतदारसंघातील (Vadgaon Sheri Vidhan Sabha Constituency) भाजपच्या नगरसेविका शितल सावंत (Corporator Sawant Shital Ajay) यांचे पती अजय सावंत (Ajay Sawant) यांनी राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या उपस्थितीत शनिवारी राष्ट्रवादीत (NCP) प्रवेश केला. त्याचबरोबर नगरसेविका सावंत देखील लवकरच राष्ट्रवादीचं घड्याळ हाती बांधणार असल्याचं म्हटलं जातंय.

 

 

विभागीय आयुक्त कार्यालय येथे अजय सावंत (Ajay Sawant) यांनी कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. यावेळी आमदार सुनिल टिंगरे (MLA Sunil Tingre) उपस्थित होते. दरम्यान, राज्य सभेचे माजी खासदार संजय काकडे (Former MP Sanjay Kakade) यांचे समर्थक म्हणून सावंत यांची ओळख होती. मागील महापालिका निवडणुकीमध्ये सावंत यांनी काँग्रेस मधून भाजपमध्ये प्रवेश केला होता. आता त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्याने भाजपला पहिला धक्का बसला आहे. (Pune Political News)

आगामी महापालिका निवडणुकीच्या (PMC Elections) पार्श्वभूमीवर पुण्यातील भाजप आणि राष्ट्रवादी (BJP And NCP) यांच्यात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत.
काही दिवसांपुर्वी पुणे राष्ट्रवादी पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप (Prashant Jagtap) यांनी भाजपचे 16 नगरसेवक राष्ट्रवादीच्या संपर्कात असल्याचा दावा केला होता.
यानंतर आता अवघ्या आठवडाभरातच राष्ट्रवादीने भाजपच्या नगरसेविकेच्या पतीला राष्ट्रवादीत घेतले आहे.
नगरसेविका सावंत यांच्या नगरसेविका पदाच्या राजीनाम्याची तांत्रिक प्रक्रिया झाली नसल्याने त्यांचा प्रवेश लांबला असून आगामी आठवड्यामध्ये राष्ट्रवादीत प्रवेश करतील असं सांगण्यात येत आहे.

 

Web Title :- Pune Political News | pune first blow to ruling bjp corporator sawant shital husband Ajay sawant joins ncp in pune ajit pawar mla sunil tingre

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

7th Pay Commission Updates | मोदी सरकार देणार 2 लाख रुपयांपर्यंतची भेट ! 1 कोटीपेक्षा जास्त लोकांना होईल फायदा

 

Udayanraje Bhosale-Ajit Pawar | उदयनराजे भोसले-अजित पवारांच्या भेटीनं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण, राष्ट्रवादीत प्रवेश करणार? भाजप खासदार म्हणाले…(व्हिडीओ)

 

Pune Crime | पुण्यात 17 वर्षाच्या मुलीचा गळा दाबून चाकूने पाठीत, छातीवर, पोटावर व पायावर सपासप वार; चंदननगर परिसरातील घटनेने प्रचंड खळबळ