Udayanraje Bhosale-Ajit Pawar | उदयनराजे भोसले-अजित पवारांच्या भेटीनं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण, राष्ट्रवादीत प्रवेश करणार? भाजप खासदार म्हणाले…(व्हिडीओ)

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Udayanraje Bhosale-Ajit Pawar | मागील काही वर्ष झाली राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देऊन भाजपचं कमळ हाती घेतलेले राज्यसभेचे खासदार उदयनराजे भोसले (BJP MP Udayanraje Bhosale) यांनी आज (शनिवारी) राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांची भेट घेतली आहे. पुण्यातील (Pune News) सर्किट हाऊस येथे अजित पवार आणि उदयनराजे भोसले यांची बैठक पार पडली. दरम्यान याच भेटीनंतर आता राज्यातील राजकीय वातावरण रंगलं असल्याचं दिसत आहे. उदयनराजे भोसले पुन्हा राष्ट्रवादीत (NCP) प्रवेश करणार का? असा सवाल उपस्थित होत राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. (Udayanraje Bhosale-Ajit Pawar)
उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांनी 15 डिसेंबर 2021 रोजी शरद पवारांच्या (Sharad Pawar) दिल्लीतील 6 जनपथ निवासस्थानी भेट घेतली होती. दोन्ही नेत्यांमध्ये झालेल्या या भेटीनंतर राजकीय वर्तुळात विविध चर्चा रंगण्यास सुरूवात झाली होती. यानंतर आज अजित पवार यांची भेट घेतली. यामुळे राजकीय वर्तुळात तर्क वितर्क लढवले जात आहेत. दरम्यान, अजित पवार यांची भेट घेतल्यानंतर उदयनराजे यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. त्यावेळी उदयनराजे भोसले यांना राष्ट्रवादीत (NCP) प्रवेश करणार का? असा सवाल माध्यमांनी केला असता त्यावर उदयनराजे भोसले म्हणाले की, ”जसा सर्वधर्म समभाव तसाच सर्व पक्ष समभाव मी मानतो.” असं सूचक उत्तर त्यांनी दिलं आहे. (Udayanraje Bhosale-Ajit Pawar)
उदयनराजे भोसले म्हणाले, ”अजितदादांसोबत विकासकामांबाबत सकारात्मक चर्चा झाली.” वाईन विक्रीच्या निर्णयाबाबत उदयनराजे भोसले यांनी म्हटलं, ”वाईन विक्रीचा निर्णय का घेतला हे सरकारलाच विचारा. प्रत्येक व्यक्ती हा स्वतंत्र असतो त्यामुळे काय घ्यायचं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे.” असं ते म्हणाले.
Web Title :- Udayanraje Bhosale-Ajit Pawar | BJP MP udayanraj bhosale meet ajit pawar in pune will he join ncp again read his reply on this question
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update