पुणे पोलीस : आठवड्याची TRM बैठक प्रथमच व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून

पुणे, पोलीसनामा ऑनलाइन – पुणे पोलीस दलातील महत्वाच्या बैठकांमधील असणारी आठवड्याची टीआरएम बैठक प्रथमच व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून होणार आहे. त्यामुळे सर्व पोलीस ठाण्यांना जीमेल आयडी काढण्यास सांगण्यात आले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती पोलिस सुत्रांनी दिली आहे. त्यामुळे प्रथमच अधिकार्‍यांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. बैठकीला शहरातील सर्व पोलीस निरीक्षक, सहायक आयुक्त, उपायुक्त, अप्पर आयुक्त यांच्यासह तपासातील अधिकारी उपस्थित असतात. त्यामुळे या बैठकीला गर्दी होते.

शहरातील गुन्हेगारी कमी व्हावी, प्रलंबीत प्रकरणांचा आढावा घेता यावा तसेच प्रलंबित गुन्ह्यांचे स्टेट्स आणि त्यावर काही सूचनांसाठी दर मंगळवारी टीआरएम (ट्यूजडे रिव्ह्यूव मिटींग) बैठक घेतली जाते. पुणे पोलीस आयुक्त पदाचा पदभार घेतल्यानंतर डॉ. के. व्यंकटेशम यांनी ही बैठक सुरू केली होती. त्यानंतर आजपर्यंत अपवाद वगळता एकदाही ही बैठक रद्द झालेली नाही. प्रथम ही बैठक शहरातील वेगवेगळ्या भागात घेतली जात होती.

टीआरएम बैठक सुरू झाल्यानंतर काही बैठकानंतरच सर्व पोलीस निरीक्षकांनी धस्काच घेतला होता. याठिकाणी प्रत्येक गुन्ह्यांचे स्टेट्स तर सांगावेच लागत होते. परंतु, काही कमी जास्त असेल तर, त्याचठिकाणी थेट आयुक्तांकडूनच विचारणा होत कान उघडणी केली जात. त्यामुळे प्रत्येकजनच टीआरएम बैठक म्हणताच दबावातच येत असत. पोलीस निरीक्षकानंतर गेल्या काही महिन्यांत वरिष्ठ अधिकार्‍यांनाही या बैठकीला वैतागल्याचे बोलवून दाखविण्यास सुरूवात केली आहे. त्याचठिकाणी या वरिष्ठांनाही काही प्रश्नांना सामोरे जावे लागत असत. सर्वासमक्ष आयुक्त खडेबोल सुनावत. सर्वासमक्ष वरिष्ठांचीही गय होत नसल्याने नाराजीचा सूर निघत आहे.

या बैठकीतून कधी सुटका होणार, याचीच सर्व वाट पाहत. पण, आयुक्तांनी सर्व सामान्यांच्या भल्यासाठी सुरू केलेली या बैठकीत खंड पडू दिला नाही. त्याचा चांगलाच परिणाम जाणवला आहे. प्रत्येक गुन्ह्यांवर वरिष्ठांची नजर असल्याने काही अपवाद वगळता योग्य तपास होऊ लागला आहे.

दरम्यान, जगभरात थैमान घातलेल्या कोरोना राज्यासोबतच पुण्यात येऊन धडकला आहे. राज्यात सर्वाधिक पुण्यात आहेत. त्यामुळे प्रत्येकजन भितीच्या छायेखाली आहे. शासनांकडून शाळा, महाविद्यालये, खासगी कार्यक्रम, सभा तसेच शासकीय कार्यक्रम तर रद्द करण्यात आले आहेतच. पण, विनाकारण गर्दी न करण्याचे देखील आवाहन करण्यात आले आहे. त्यामुळे पुणे पोलीसांकडून पोलीस आयुक्तालयात होणारी टीआरएम बैठक रद्द करत ती व्हिडीओ कॉन्फरन्सींगद्वारे घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे मात्र सर्वांनी सुटकेचा श्वास सोडला आहे.