पुण्यात लग्नाच्या आमिषाने 32 वर्षीय डॉक्टर तरूणीवर लैंगिक अत्याचार, बीडमधील युवकावर गुन्हा

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  – स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या एका डॉक्टर तरुणीवर जबरदस्तीने अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. तरुणीने लग्नाबाबत विचारले असता तिला जातीवाचक शिवीगाळ केली. अश्लील व्हिडिओ आणि फोटो व्हायरल करण्याची धमकी देत जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. अद्याप आरोपीला अटक केलेली नाही.

याप्रकरणी अनिल कुमार गिते (वय 27, खानेकर वाडा, मूळ. परळी वैजनाथ) याच्यावर बलात्कार आणि अट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत 30 वर्षीय पीडित तरुणीने विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुणी ही बीएमएचएस आहेत. त्या प्रॅक्टिस न करता स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत होत्या. गेली 10 वर्ष त्या पुण्यात आहेत. स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असताना त्यांची ओळख आरोपी अनिल गिते याच्यासोबत झाली. ओळखीचे रूपांतर मैत्रीत आणि नंतर प्रेमात झोले. परंतु, यावेळी फिर्यादी यांनी त्याला लग्न करत अशील तरच मी प्रेमास होकार देईल असे सांगितले. त्यावेळी त्याने लग्न करण्याचे वचन दिले. त्यानंतर ते एकत्र अभ्यासिकेत जात असत. त्याने तरुणीचे न कळत फोटो व व्हिडीओ काढले होते. ते डिलीट करावे अशी तरुणी विनंती करत होती. पण तो तरुणीला जातीवाचक शिवीगाळ करत मारहाण करत होता. तर तरुणीचे अश्लील व्हिडिओ आणि फोटो घरच्यांना दाखवेल असे म्हणत ब्लॅकमेलिंग करण्यास सुरुवात केली. तसेच तिला व कूटुंबाला मारण्याची धमकी दिली. तरुणीने भीतीपोटी काही दिवस शांत राहिली. पण त्रास होत असल्याने तिने पोलिसांकडे धाव घेऊन तक्रार दिली.

दरम्यान अद्याप आरोपीला अटक करण्यात आलेली नाही. पोलीस तरुणाला गेली दहा दिवस फक्त कारण देत आहेत. अधिक तपास सहायक पोलीस आयुक्त यादव हे करत आहेत.