पुणे : कसब्यात धंगेकरांचा काँग्रेसचे अरविंद शिंदे यांना पाठींबा

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कसबा विधानसभा मतदारसंघातील कॉंग्रेस- राष्ट्रवादी कॉंग्रेस व मित्रपक्ष आघाडीचे कॉंग्रेस पक्षाचे उमेदवार अरविंद शिंदे यांना या मतदार संघातील कॉंग्रेस पक्षाचे अन्य इच्छुक रवींद्र धंगेकर यांनी आज पूर्ण पाठींबा जाहीर केला. तसेच उमेदवारी अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी अर्जही दाखल केला नाही.

यावेळी रवींद्र धंगेकर म्हणाले कि, कसबा विधानसभा मतदारसंघात मी देखील उमेदवार झालो असतो तर काँग्रेसच्या उमेदवारावर त्याचा परिणाम झाला असता व अंतिमतः भारतीय जनता पक्षालाच फायदा झाला असता. या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला रोखणे महत्वाचे असून त्यासाठीच मी या मतदारसंघात उमेदवार म्हणून अर्ज भरत नसून पूर्ण ताकतीने काँग्रेस उमेदवार अरविंद शिंदे यांना पाठिंबा देत आहे.

यावेळी त्यांच्या कार्यालयात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मोहन जोशी, शहर काँग्रेस अध्यक्ष रमेश बागवे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व प्रवक्ते अंकुश काकडे, काँग्रेसचे उमेदवार अरविंद शिंदे, प्रदेश सरचिटणीस रोहित टिळक, बाळासाहेब अमराळे, दत्ता सागरे यासह प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.

visit : Policenama.com