जबरी चोरीच्या गुन्ह्यातील फरार सराईत गुन्हेगार एलसीबीच्या जाळ्यात

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – लोणीकंद पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या एका जबरी चोरीच्या गुन्ह्यातील सराईत गुन्हेगारांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे.

तुषार रखमाजी पवार (वय 19 रा. पिंपळनेर ता.पारनेर जि. अहमदनगर) आणि राजू विजय तुपे (वय 22 रा. आवटेवाडी ता. श्रीगोंदा जि. अहमदनगर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांचा एक साथीदार पसार असून, त्याचा शोध घेतला जात आहे. याबाबत पंकजकुमार प्रजापती (वय 24) याने लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

दोन दिवसांपुर्वी रात्री सात वाजणअयाच्या सुमारास लोणीकंद येथील महाराष्ट्र बँकेचे समोरून लोणीकंद माथा येते पायी चालत जात होते. त्यावेळी दुचाकीवर आलेल्या तिघांनी त्याला अडवून डोक्यात दगड घालून त्याच्या खिसातील रोकड आणि मोबाईल चोरून नेला होता. या गुन्ह्याचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखा करत होती. त्यादरम्यान, पोलिसांनी हा गुन्हा सराईत गुन्हेगार तुषार व त्याच्या साथीदारांनी केला असल्याचे समजले. त्यानुसार, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि दत्तात्रय गुंड, सहा. फौज/ दत्तात्रेय गिरमकर, सहायक फौजदार दयानंद लीमन तसेच पथकातील सचिन गायकवाड, ज्ञानेश्वर क्षिरसागर, जनार्दन शेळके, एम आय मोमीन व राजापुरे यांच्या पथकाने या दोघांना अटक केली आहे. त्यांचा साथीदार पसार झाला असून, त्याचा शोध घेतला जात आहे. पुढील कारवाईसाठी आरोपी लोणीकंद पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहेत.