पोलीस हवालदारास २० हजारांची लाच घेताना अटक

बारामती : पोलीसनामा ऑनलाईन

जमीनीच्या व्यवहारात झालेल्या फसवणुकीच्या गुन्ह्यामध्ये मदत करण्यासाठी २० हजारांची लाचेची मागणी करुन ती स्विकारताना पोलीस हवालदाराला अटक करण्यात आली. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आज (गुरुवार) बारामती शहर पोलीस ठाण्यात केली.

दादासाहेब महादेव ठोंबरे (वय-४७) असे अटक करण्यात आलेल्या हवालदाराचे नाव आहे. याप्रकरणी बारामती येथील व्यक्तीने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती.

[amazon_link asins=’B0728GFX26′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’1b1b9f6b-8654-11e8-8ad1-25367483236f’]

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांची जमीनीच्या व्यवहारत फसवणूक करण्यात आली आहे. तक्रारदारांनी बारामती शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्याच्या तपासात मदत करण्यासाठी हवालदार दादासाहेब ठोंबरे याने तक्रारदाराकडे २० हजार रुपयांची लाचेची मागणी केली. तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने तक्रारीची खातरजमा करुन बारामती शहर पोलीस ठाण्यात सापळा रचला. हवालदार ठोंबरे याला २० हजार रुपयांची लाच स्विकारताना रंगेहाथ अटक करण्यात आली.

ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक संदीप दिवाण यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली.