Pune : 4 हजारांची लाच घेताना सासवड येथील अधिकारी प्रमोद तुपे अ‍ॅन्टी करप्शननं रंगेहाथ पकडलं

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  शेत जमिनीची मोजणी करण्यासाठी 4 हजार रुपयांची लाच घेताना सासवड येथील नगर भूमापन लिपिकास एसीबीने रंगेहात पकडले आहे.

प्रमोद गणेश तुपे (वय ३०) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी सासवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.

प्रमोद हे भूमी अभिलेख कार्यालयात नगर भूमापक लिपिक आहेत. यातील 35 वर्षीय तक्रारदार यांच्या जमिनीची मोजणी करायची होती. यासाठी त्यांनी अर्ज केला होता. यावेळी लोकसेवक प्रमोद यांनी तक्रारदार यांच्याकडे 10 हजार रुपयांची लाचेची मागणी केली होती. याबाबत तक्रारदार यांनी एसीबीकडे तक्रार केली होती. त्याची पडताळणी करण्यात आली. त्यानुसार आज सापळा कारवाईत प्रमोद यांना तडजोडीअंती 4 हजार रुपयांची लाच घेताना पकडले आहे.