टाटास्टील डाऊन स्ट्रीम कंपनीच्या वतीने तहसीलदारांना दिले 100 कीट

पुणे : कोरोना व्हायरसचा संसर्ग रोखण्यासाठी देश लॉकडाऊन असल्याने सर्व व्यवहार ठप्प आहेत. एक हात मदतीचा पुढे करत कर्तव्य म्हणून शासनाबरोबर अनेक सामाजिक संस्था संघटनांनी गरजूंना मदत दिली. या भावनेने रांजणगाव एमआयडीसीतील (ता.शिरूर) टाटा स्टील डाऊन स्ट्रीम प्रॉडक्ट लि. या कंपनीच्या वतीने आटा, तांदूळ, डाळ व तेल अशा वस्तूंची 100 कीट तयार केली. कंपनीचे बिझनेस विभागप्रमुख वेंकट पंपटवार यांच्या मार्गदर्शनाखाली ही मदत तहसील कार्यालयामध्ये देण्यात आली. याप्रसंगी तहसीलदार लैला शेख, कंपनीचे मनुष्यबळ विकास अधिकरी संतोष चिखले, प्रशांत सोनवणे, संतोष साळुंखे यांच्यासह स्थानिक अधिकारी उपस्थित होते.

दरम्यान, कपंनीच्या वतीने रांजणगाव गणपती, कारेगाव, ठोकसांगवी येथील एक हजार गरिब व गरजूंना जीवनावश्यकवस्तू देण्यात आले. तसेच रांजणगाव येथील मंगल कार्यालयात ठेवण्यात आलेल्या कामगारांना नाश्ता व पिण्याचे पाणी देण्यात येत आहे, असे मनुष्यबळ विकास अधिकारी संतोष चिखले यांनी सांगितले.