Pune Station Platform Ticket | पुणेकरांना दिलासा ! प्लॅटफॉर्म तिकीट दर पुन्हा 50 रूपयांवरून 10 रूपये

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – रेल्वेने प्रवास करणाऱ्या पुणेकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. पुणे रेल्वे स्थानकावरील (Pune Railway Station) प्लॅटफॉर्म तिकीटाचे (Platform Ticket) दर कमी करण्यात आले आहे. पुणे रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म तिकीट (Pune Station Platform Ticket) मंगळवार पासून पुन्हा 10 करण्यात आले आहे. कोरोनाचा (Corona) वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर रेल्वे स्थानकावरील गर्दी कमी करण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून (Railway Administration) प्लॅट फॉर्म तिकीट 50 रुपये केले होते. हे नवे दर 17 जानेवारी ते 15 फेब्रुवारीपर्यंत लागू करण्यात आले होते. मात्र आजपासून पुन्हा हे दर 10 रुपये करण्यात आले आहे. (Pune Station Platform Ticket)
रेल्वे अधिकाऱ्यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, प्लॅटफॉर्म तिकीटाच्या वाढलेल्या दरामुळे अनेक प्रवाशांना त्रासाला सामोरे जावे लागत होते. तिकीट खिडक्यांची संख्या मोजकी असल्यामुळे तिकिटासाठी प्रवाशांना रांगेत उभे राहावे लागत होते. यामुळे प्रशासनाने पुन्हा प्लॅटफॉर्म तिकीटाची मूळ रक्कम लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.
सध्या पुण्यातील कोरोनाचा (Pune Corona) प्रादुर्भाव कमी होत आहे.
पुणे रेल्वे विभागाने (Pune Railway Department) रेल्वे स्थानक आणि आवारातील गर्दीवर नियंत्रण
ठेवण्यासाठी प्लॅटफॉर्म तिकिटांच्या किमतीमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र या निर्णयाचा नागरिकांकडून निषेध करण्यात आला.
त्यानंतर आता प्रवाशांचा प्रवास सुखकर करण्यासाठी प्लॅटफॉर्म तिकिटाची किंमत पुन्हा पूर्वीप्रमाणे 10 रुपये इतकी करण्यात आली आहे.
Web Title :- Pune Station platform ticket for rs 10 again at pune station reduced from earlier price 50
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
NCP Prashant Jagtap | भ्रमनिरास करणारा दिशाहिन अर्थसंकल्प, राष्ट्रवादी काँग्रेसची टीका