पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात चर्चेत आलेले मंत्री संजय राठोड कोण आहेत ?

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – मूळची बीडची असणारी पूजा चव्हाण (वय २२) सध्या ती पुण्यात राहत होती. हिच्या आत्महत्येनंतर राजकारणात विविध चर्चा सुरु झाल्या आहेत, ह्या प्रकरणानंतर आता या मुलीच्या आत्महत्येवरून मंत्री संजय राठोड यांचे नाव पुढे आले आहे. या कथित मंत्र्यासोबत असलेल्या प्रेमसंबंधातून तरूणीने आत्महत्या केली आहे असा आरोप भाजपाने केला आहे. आता हा मंत्री कोण आहे, अशी चर्चा सोशल मीडियात सुरू होती.

दरम्यान, यवतामाळमधील शिवसेनेचे आमदार आणि राज्यातील मंत्रिमंडळात वनमंत्रिपदी असणारे संजय राठोड यांचे नाव प्रथमच या प्रकरणात उघडपणे समोर आले आहे. तर भाजपाच्या प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी थेट संजय राठोड यांचे नाव घेऊन ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. तसेच बंजारा समाजाचे नेते म्हणून संजय राठोड यांची ओळख आहे, दरम्यान पूजा चव्हाण ही बीड जिल्ह्यातील परळीत राहणारी होती, परळीत तिचे आई-वडील राहतात, नंतर ती १ महिन्यापूर्वी पुण्यात स्पोकन इंग्लिशच्या क्लासेससाठी आली होती. भाऊ विलास चव्हाण व मित्र अरुण राठोड यांच्या सोबत ती भाड्याच्या घरात राहत होती. तेव्हा तिने रात्री दीड वाजण्याच्या सुमारास गॅलरीतून उडी टाकली. तिच्या डोक्याला मार लागल्याने ती जागीच मृत्यू पावली.

कोण आहेत संजय राठोड ?
महाविकास आघाडी सरकारमध्ये संजय राठोड यांनी वनमंत्री आहेत, यवतमाळ जिल्हा काँग्रेसमध्ये असताना बाळासाहेब ठाकरेंच्या विचाराने प्रेरित होऊन संजय राठोड यांनी शिवसेनेत प्रवेश केला. १९९० ते २००० साली यवतमाळ मध्ये तरूण तडफदार चेहरा म्हणून शिवसेनेचं काम केले. तेथे काँग्रेसचं वर्चस्व असताना २७ व्या वर्षी त्यांनी शिवसेनेचं यवतमाळ जिल्हाप्रमुखपद सांभाळलं. १९९७ पासून ते २००४ पर्यंत कठीण संघर्षातून संजय राठोड यांनी यवतमाळमध्ये शिवसेनेचा भगवा फडकवला, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माणिकराव ठाकरे यांचा पराभव केला आणि आमदार झाले. २००९ मध्ये दिग्गज मतदारसंघातून बाजी मारत काँग्रेसच्या संजय देशमुखांचा पराभव केला, २०१४ मध्ये पुन्हा निवडून येत संजय राठोड यांनी विजयाची हॅट्रिक साधली, तर २०१९ मध्येही ते पुन्हा आमदार झाले. संजय राठोड हे कायम राजकीय भूमिकांपेक्षा वैयक्तिक आयुष्यात चर्चेत राहिले, कधी डान्स तर कधी सायकल चालवणं,तर विजयानंतर उदयनराजेंसारखी कॉलर उडवलेली दृश्य पाहायला मिळाली.