Pune Swimming Pool | पुण्यातील जलतरण तलाव खुले, पण… – अजित पवार (व्हिडीओ)

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Swimming Pool | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील जलतरण तलाव (Pune Swimming Pool) बंद करण्यात आले आहेत. मात्र, खेळाडूंनी सराव करण्यासाठी जलतरण तलाव सुरु करण्याची मागणी प्रशासनाकडे केली होती. आज कोरोना (Corona) आढावा बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी पुण्यातील खेळाडूंना सराव करण्यासाठी जलतरण तलाव खुले करण्यात आले आहेत. परंतु खेळाडूंनी ‘कोरोना’ लसीचे दोन डोस घेतलेले असले पाहिजेत असे अजित पवार यांनी सांगितले.

 

Pune News | येत्या रविवारी पुणे अन् पिंपरीमधील सर्व दुकाने पुर्णपणे बंद राहणार, हॉटेल अन् रेस्टॉरंटबाबत झाला ‘हा’ निर्णय (व्हिडिओ) 

 

पुण्यातील जलतरण तलावामध्ये राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धामध्ये भाग घेतलेल्या जलतरणपटूंना सराव करता यावा यासाठी अजित पवार यांनी आज महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. अजित पवार यांनी खेळाडूंना (Players) या ठिकाणी सराव (Practice) करण्यास परवानगी दिली असल्याचे सांगत संबंधित खेळाडूने लसीचे (vaccine) दोन डोस घेतलेले असले पाहिजेत असे सांगितले. त्यामुळे खेळाडूंना जलतरण तलावात सराव करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मात्र, ते फक्त लसीचे दोन डोस घेतलेल्यांसाठी खुले करण्यात येणार आहेत. 18 वर्षाच्या खालील मुलांसाठी जलतरण तलावात सराव करण्यासाठी प्रवेश नसणार आहे असा याचा अर्थ आहे.

विसर्जनाच्या दिवशी हॉटेल्स सुरु राहणार

पुण्यातील पत्रकार परिषदेत बोलताना अजित पवार यांनी सांगितले की, विसर्जनाच्या (ganesh visarjan) दिवशी दुकाने बंद राहणार आहे. असे असले तरी हॉटेल (Hotel) आणि रेस्टॉरंट (restaurants) सुरुच राहतील. कोरोना नियंत्रणात आहे. मात्र, गणेशोत्सावानंतर काय होणार याची माहिती नाही. परिस्थिती आटोक्यात राहिली, तर आढावा घेऊन पुढील निर्णय घेतला जाईल. तोपर्यंत निर्बंध जैसे थे राहतील. परिस्थिती सुधारल्यास 2 ऑक्टोबर पासून पुण्यातील निर्बंधाबाबत पुढील निर्णय घेतले जातील, असेही अजित पवार यांनी सांगितले.

हे देखील वाचा

Uddhav Thackeray | शिवसेना-भाजपची युती होणार? मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंच्या ‘त्या’ वक्तव्याने चर्चांना उधाण

CM Uddhav Thackeray | ‘व्यासपीठावर उपस्थित माझे भावी सहकारी…’ CM उद्धव ठाकरे याचं मोठं विधान, राजकीय वर्तुळात चर्चा

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  Pune Swimming Pool | Swimming pool in Pune open, but … – Ajit Pawar (Video)

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update