पुणे पुन्हा @40 ‘ c, राज्यात उष्णतेची लाट

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – राज्यात सध्या उष्णतेची लाट आहे. त्यात शनिवारी पुण्यात पुन्हा तापमानाने चाळीशी गाठली तर राज्यात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट आहे. शनिवारी पुण्यात ४० अंश सेल्सिअस तर लोहगाव येथे ४०.७ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. तर सर्वात कमी किमान तापमानाची नोंदही पुण्यातच झाली आहे.

राज्यात सध्या काही ठिकाणी उष्णतेची लाट आहे. सुर्य आग ओकत आहे. विदर्भात काही ठिकाणी तर मध्य महाराष्ट्रात, मराठवाड्यात, उष्णतेच्या लाटेमुळे नागरिक उकाड्याने हैराण आहेत. विदर्भात उष्णतेची लाट आणखी दोन दिवस राहणार आहे. ती या दोन दिवसात आणखी तीव्र होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. २१ व २२ मे रोजी विदरभातील उष्णतेची लाट तीव्र होण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी खबरदारी घेण्याचे हवामान विभागाने सांगितले आहे.

राज्यात चंद्रपूर येथे सर्वाधिक ४५.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर पुण्यात कमाल तापमान शनिवारी ४० अंश सेल्सिस तर लोहगाव येथे ४०. ७ अंश सेल्सिअस इतके होते. दर सर्वात कमी किमान २०.४ अंश सेल्सीअस तापमानाचीही नोंद पुण्यात झाली आहे.

देशात विदर्भातील काही भाग आणि पश्चिम बंगाल, ओडिशा, झारखंड, बिहार, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, तेलंगणा, तामिळनाडु, उत्तर
कर्नाटकाच्या अंतर्गत भागात काही ठिकाणी उष्णतेच्या लाटेचा परिणाम जाणवेल असे हवामान विभागाने सांगितले आहे. तर १९ मे रोजी विदर्भ, मराठावाडा, मध्य महाराष्ट्रात उष्णतेची लाट राहीलय  तर २० मे रोजी मराठवाड्यात व विदर्भात काही ठिकाणी ही लाट राहणार आहे. आणि २१ व २२ मे रोजी ही लाट तीव्र होण्याची शक्यता आहे. असा इशारा हवामान विभागाने दिला आहे.