पुणे : ट्रकच्या धडकेत शालेय विद्यार्थ्याचा मृत्यू

खडकवासला : पोलीसनामा ऑनलाईन

भरधाव वेगात जाणाऱ्या ट्रकची धडक दुचाकीला बसून दुचाकीवरील शालेय विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू झाला तर एकजण गंभीर जखमी झाला. हा अपघात खानापूर-रांजणे रस्त्यावर गुरुवारी (दि.२२) दुपारी बाराच्या सुमारास झाला. याप्रकरणी ट्रक चालकाला ताब्यात घेण्यात आले आहे.

अपघातात तन्मय बाळू शिंदे ( वय १४ रा. आंबेड ,ता. वेल्हे ) असे मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे. तर निलेश बाळू जागडे हा गंभीर जखमी झाला आहे. तन्मय हा आंबेड येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत शिकत होता.
[amazon_link asins=’B077PWBC7J’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’821fb9ca-a6ec-11e8-ba14-9d93b700bf21′]

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तन्मय आणि निलेश जागजे हे खानापूर येथे केस कापण्यासाठी मोटरसायकलवरून खानापूर येथे जात होते. मणेरवाडीच्या हद्दीत तिरंगा हाँटेल जवळ मालट्रक (जीजे ०२. व्ही. व्ही ०५७५ ) ची पाठीमागून जोरात धडक होऊन मोटरसायकलवर पाठीमागे बसलेला तन्मय हा गंभीर जखमी होऊन मृत्यूमुखी पडला. हवेली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अशोक शेळके व पोलीस नाईक किरण बरकाले यांनी घटनास्थळी धाव घेतली. तन्मय याचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी हवेली पोलीसांनी ससून रूग्णालयात पाठवून दिला. या प्रकरणी मालट्रक चालकास पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी हवेली पोलीस तपास करत आहेत.