नामांकित रुग्णालयामध्ये चोरी, तरुणाला अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – शहरातील एका नामांकित रुग्णालयातील फार्मासिस्टमधील साहित्या चोरी करणार्‍या तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे. त्याने मास्क, इंजेक्शन, टॅबलेट्स चोरले होते.
सुयश हिराचंद पांढरे (वय 28, रा. आंबेगाव, कात्रज) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी अ‍ॅलन थॉमस (वय 57,रा. वडगाव शेरी) यांनी कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुयश कोरेगाव पार्क परिसरातील एका नामांकित रुग्णालयात फार्मासिस्ट म्हणून काम करत होता. त्यावेळी त्याने मास्क, इंजेक्शन, टॅबलेट्स मिळून 36 हजारांचे मेडीकल चोरल्याचे डेटा इंट्रीवरुन निष्पन्न झाले. यानंतर थॉमस यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. त्यानुसार, पांढरे याच्यावर गुन्हा दाखलकरून त्याला अटक करण्यात आली आहे. अधिक तपास उपनिरीक्षक श्रीकांत गुरव करत आहेत.