पीएमपीएमल प्रवासात जेष्ठ महिलेची सोन्याची बांगडी चोरीला

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – शहरात पीएमपीएमल बस प्रवासात गर्दीचा फायदा घेउन चोरटे चोख कामगिरी करत आहेत. दररोज या घटना घडत असताना पोलीस मात्र या टोळ्यांना पकडू शकत नसल्याचे दिसत असून, पुन्हा एकदा जेष्ठ महिलेच्या हातातील ४० हजार रुपये किंमतीची सोन्याची बांगडी चोरुन नेली. याप्रकरणी एका ७० वर्षीय महिलेने स्वारगेट पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला गृहिणी आहेत. 3 दिवसांपुर्वी त्या नरवीर तानाजीवाडी ते पद्मावती दरम्यान बसप्रवास करीत होत्या. त्यावेळी बसमध्ये गर्दीचा फायदा घेउन चोरट्यांनी महिलेच्या हातातील ४० हजारांची सोन्याची बांगडी चोरुन पळ काढला. याप्रकरणी स्वारगेट पोलिस अधिक तपास करीत आहेत.

चोरच सरस ठरत आहेत…
बसप्रवासात महिलांचे दागिने लांबविण्याचे सत्र कायम आहे. जेष्ठ महिलांवर पाळत ठेऊन हातातील सोन्याच्या बांगड्या चोरुन नेल्या जात आहे. आठवड्यात चार महिलांच्या सोन्याच्या बांगड्या चोरीला गेल्यामुळे पीएमपीएल बसमधुन प्रवास करावा की नाही याबद्दल महिलांमध्ये भीती निर्माण झाली आहे.
पीएमपीएमल प्रशासन किंवा पोलिसांकडून प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी हलगर्जीपणा बाळगला जात असल्याने महिलांनी नाराजी व्यक्त केली आहे. तर गेल्या काही महिन्यात 50 हुन अधिक घटना घडल्या आहेत. त्यामुळे पोलिसांपेक्षा चोरटेच सरस ठरत आहेत.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/