Pune : हडपसरच्या म्हाडा कॉलनीत एकतर्फी प्रेमातून युवतीच्या तोंडावर अ‍ॅसिड फेकण्याची धमकी; पिडीतेच्या वडिलांना व काकांना बेदम मारहाण, परिसरात खळबळ

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – एकतर्फी प्रेम प्रकरणातून अल्पवयीन मुलीचा पाठलाग करत तिला गिफ्ट देण्याचा प्रयत्न केल्यानंतर तिने गिफ्ट घेण्यास नकार दिला. त्यानंतर युवकाने तिच्या तोंडावर अ‍ॅसिड फेकण्याची धमकी दिली. तिचे वडील जाब विचारण्यास गेले असता त्यांच्यासह पूर्ण कुटुंबाला बेदम मारहाण केली.

याप्रकरणी सलोद्दीन पठाण, मुशरफ शेख, जुबेर बागवानसह चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पीडित मुलीच्या आईने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. म्हाडा कॉलनी भागात हा प्रकार घडला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या अल्पवयीन मुलीवर मुशरफ हा एकतर्फी प्रेम करत होता.. त्यातून तो मुलीचा वारंवार पाठलाग करून तिला पाहून शेरोशायरी करत असे. तर त्याने (दि. 15 मे) तिला एक ब्रेसलेट गिफ्ट देण्याचा प्रयत्न केला. मात्र, या मुलीने गिफ्ट घेण्यास नकार दिला. यावेळी आरोपीने मुलीला तोंडावर अ‍ॅसिड फेकण्याची धमकी दिली. मुलगी घाबरून पळाली. यानंतर मुलीने आईला हा सर्व प्रकार सांगितला. त्यामुळे फिर्यादी यांचे पती जाब विचारण्यासाठी गेले तर आरोपी व त्याच्या इतर नातेवाईकांनी संगनमत करून फिर्यादीला शिवीगाळ करत मारहाण केली. फिर्यादीच्या पतीच्या केसाला धरून त्यांचे डोके भिंतीवर आपटले. भांडणात मध्यस्थी करणाऱ्या फिर्यादीच्या यांच्या दिराला धारदार शस्त्राने डोक्यात मारहाण करून जखमी केले. अधिक तपास हडपसर पोलीस करत आहेत.