Coronavirus : पुणेकरांसाठी चिंतेची बाब ! दिवसभरात ‘कोरोना’मुळं तिघांचा मृत्यू तर 43 नवे ‘पॉझिटिव्ह’

पुणे :  पोलीसनामा ऑनलाइन –   राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेदिवस वाढत आहे. राज्यात मुंबई आणि पुणे शहरामध्ये कोरोना बाधितांचा आकडा रोज वाढत आहे. पुण्यात आज दिवसभरात 43 नवी पॉझिटिव्हि रुग्ण आढळून आले आहे. तर तीन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची संख्या 211 झाली आहे.

पुण्यात आज 62,58 आणि 75 वर्षीय पुरुषांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. पुण्यातील डॉ. नायडू हॉस्पिटलमध्ये 362 रुग्णांवर उपचार सुरु आहे. आज मृत्यू झालेल्या व्यक्तींनी विविध आजार होते. त्यात कोरोनाची लागण झाल्याने अवयव निकामी झाल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे प्रशासनकाडून सांगण्यात आले. पुण्यातील हॉस्टिपटलमध्ये उपचार सुरु असलेल्या रुग्णांपैकी 8 रुग्णांची प्रकृती गंभीर असून त्यापैकी 4 ससून तर इतर चौघांवर खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहे. पुणे महापालिकेच्या नायडू हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेल्या तिघांचा तर खासगी हॉस्पिटलमधील एक रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

महाराष्ट्रात आज 328 नवी रुग्णांचे निदान झाले असून कोरोनाबाधित रुग्णसंख्या दिवसभरात वाढल्याचे हे लक्षण आहे. गेल्या 24 तासात 11 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये मुंबईतील पाच, पुण्यातील चार आणि ठाणे व औरंगाबाद महापालिका हद्दीतील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. त्यामुळे राज्यातील कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूची संख्या 211 झाली आहे.