पुण्यातील तृप्ती धोडमिसे युपीएससीत देशात १६ वी

पुणे : पोलीसानामा ऑनलाईन – प्रॉडक्शन इंजिनियरिंगची पदवी घेतल्यानंतर सनदी अधिकारी होण्याचं स्वप्न पाहणारी पुण्यातील तृप्ती धोडमिसे लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत राज्यात १६ वी आली आहे. घरची परिस्थिती जेमतेम असताना तिला पुण्यातच सहायक विक्रीकर आयुक्त म्हणून काम पाहण्याची संधी मिळाली. तेवढ्यावर न थांबता केलेल्या प्रयत्नता तिने घवघवीत यश संपादन केले आहे.

तृप्ती धोडमिसे ही पुण्यातील मध्यम वर्गीय कुटुंबातील मुलगी. वडील आणि आई दोघेही शिक्षक. त्यामुळे घरातच तिला अभ्यासाचं बाळकडू मिळालं. त्यामुळे तिने दहावीच्या परीक्षेत १० वा तर १२ वी च्या परीक्षेत ११ वा क्रमांक मिळविला. त्यानंतर प्रॉडक्शन इंजिनियरची पदवी घेतली. त्यानंतर तिने स्पर्धा परीक्षा देण्याचा निर्णय घेतला. त्यात य़शही मिळाले. सहायक विक्रीकर आयुक्त म्हणून पुण्यात रुजू झाली. त्यानंतर तिचा विवाह झाला.

घऱची जबाबदारी सांभाळत तिने पुन्हा परीक्षा देण्याचे ठरविले. तिने मेहनत करत घर, काम, आणि अभ्यास यांचं उत्तम नियोजन केले आणि देशात १६ वा क्रमांक मिळवत सनदी अधिकारी होण्य़ाचा मान मिळविला. त्य़ामुळे तिचे सर्च क्षेत्रातून कौतुक केले जात आहे.

तृत्ती यावर म्हणाली, की मी अभ्यास करताना घर, कार्यालय, आणि अभ्यासाचे योग्य नियोजन केले. मला आई वडील आणि सासरच्या मंडळींनी खुप सहकार्य केले. त्यांचा पाठींबा मिळाला त्यामुळेच मी यशस्वी होऊ शकले.