पुणे : पिस्टल विक्रीसाठी आलेल्या दोघांना गुन्हे शाखेकडून अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन

गावठी बनावटीचे पिस्टल आणि काडतुसे विक्रीसाठी आलेल्या दोघांना अटक करण्यात आली आहे. या दोघांकडून ७५ हजार ५०० रुपयांचे दोन गावठी पिस्तूल आणि पाच काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. ही कारवाई गुन्हे शाखेच्या वाहनचोरी विरोधी पथकाने नुकतीच गणेश पेठे, दुधभट्टी येथे केली.

[amazon_link asins=’B0756Z43QS,B01DDP7D6W’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’fcf3d280-ba69-11e8-963c-ab83a148891a’]

आकाश लहू तावरे (वय-२१ रा. भोर), दिपक बाळासाहेब पासलकर (वय-२५ रा. मुपो कुरुनबुद्रुक, ता. वेल्हा, जि. पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी पोलीस कर्मचारी शंकर सापते यांनी फरासखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फरासखाना पोलिसांनी दोघांविरुद्ध आर्म अॅक्टनुसार गुन्हा दाखल केला आहे.

गणेशोत्सव काळात वाहन चोरीच्या घडत असतात. त्यामुळे गुन्हे शाखेचे वाहन चोरी विरोधी पथक फररासखना पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत होते. त्यावेळी पथकातील पोलीस कर्मचारी शंकर संपते यांना दोन युवक दुधभट्टी येथे पिस्टल विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाली. मिळालेल्या माहितीच्या आधारे पथकाने गणेश पेठ दुधभट्टी येथे सापळा रचुन तावरे आणि पासलकर यांना ताब्यात घेतले. त्यांची अंगझडती घेतली असता त्यांच्याजवळ दोन गावठी पिस्टल आणि ५ जीवंत काडतुसे सापडले.

पुणे : पोलीस चौकित महिला पोलीस कर्मचाऱ्याला धक्काबुक्की

ही कारवाई अप्पर पोलीस आयुक्त गुन्हे शाखा प्रदीप देशपांडे, पोलीस उपायुक्त गुन्हे शिरीष सरदेशपांडे, सहायक पोलीस आयुक्त गुन्हे -२ भानुप्रताप बर्गे वाहनचोरी विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक दिपक लगड यांच्या मार्गदर्शनाखाली वाहनचोरी पथकाचे कर्मचारी सुनिल पवार, अब्दुलकरीम सय्यद, तुकाराम नाळे, हजरत पठाण, सुहास कदम, विशाल शिर्के यांच्या पथकाने केली. पुढील तपास वाहनचोरी विरोधी पथकाचे पोलीस हवालदार सुनिल पवार करीत आहेत.

[amazon_link asins=’B006526G50,B01J82IYLW’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’09db4823-ba6c-11e8-b370-0b033f014e33′]