
Pune UBT Shivsena News | ‘वेळ अशी येणार की आमचा ‘धनुष्यबाण’ परत द्यावाच लागणार’, ठाकरे गटाकडून पुण्यात बॅनरबाजी
पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune UBT Shivsena News | शिवसेनेच्या शिंदे गट आणि ठाकरे गटाची न्यायालयीन लढाई सुरु असता आता ही लढाई रस्त्यावर सुरु झाल्याचे दिसत आहे. ‘वेळ अशी येणार की आमचा ‘धनुष्यबाण’ परत द्यावाच लागणार’ अशा आशयाचे बॅनर ठाकरे गटाकडून पुण्यात लावण्यात आले आहेत. उद्या (गुरुवार) पुण्यात गणेश विसर्जन मिरवणूक निघणार आहे. ठाकरे गटाकडून विसर्जन मिरवणुकीच्या मार्गावर अशा प्रकारचे बॅनर लावण्यात आले आहेत. या बॅनरवर ‘हाती घेऊ मशाल रे, पाप जाळू खुशाल रे, जय भवानी, जय शिवाजी, धगधगत्या मशालीने महाराष्ट्र जिंकणार, वेळ अशी येणार की आमचा ‘धनुष्यबाण’ परत द्यावाच लागणार’ असा मजकूर लिहिण्यात आला आहे. (Pune UBT Shivsena News)
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने लावलेल्या बॅनरवर बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांचा फोटो वापरण्यात आला आहे. याशिवाय आनंद दिघे यांचा देखील फोटो वापरण्यात आला आहे. धनंजय देशमुख, निरंजन दाभेकर, सुमित बांदल, परेश खांडके, नितीन परदेशी, ज्ञानंद कोंढरे, परेश लोणकर या शिवसैनिकांनी हा बॅनर लावला आहे. (Pune UBT Shivsena News)
पुण्यातील खंडोजी बाबा चौकात हा बॅनर लावण्यात आला आहे. याच मार्गावरुन उद्या गणेश विसर्जन मिरवणूक जाणार आहे. पुण्यातील गणेश विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी राज्यभरातून लोक पुण्यात येत असतात. त्यांमुळे राज्यातील लोकांना देखील खरी शिवसेना ही ठाकरे यांचीच आहे आणि बाप्पाचा आशीर्वाद देखील सत्यालाच मिळणार असल्याचं या बॅनरच्या माध्यमातून सूचित करण्यात आले असल्याचे शिवसैनिकांनी सांगितलं.
दरम्यान, शिंदे गटाकडून बॅनरवर आनंद दिघे आणि बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो लावण्यात येत आहे.
यानंतर आता ठाकरे गटाने देखील बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांचा फोटो वापरण्यास सुरुवात केली आहे.
आनंद दिघे हे कट्टर शिवसैनिक होते, त्यामुळे त्यांचा फोटो वापरण्यात आल्याचे स्पष्टीकरण पुण्यातील ठाकरे गटाच्या शिवसैनिकाने दिले आहे.
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
हे देखील वाचा
Pune Ring Road | पुणे : रिंगरोडसाठी 14 गावांतील भूसंपादन पूर्ण