Pune : सीमकार्ड अपग्रेड करण्याच्या बहाण्यानं भामटयाने महिलेला घातला 2.25 लाखांचा गंडा

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन – शहरातील सायबर गुन्ह्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून, सीमकार्ड अपग्रेड करण्याच्या बहाण्याने चोरट्याने महिलेला सव्वा दोन लाखांला गंडा घतला आहे.

याप्रकरणी नम्रता काटकर ( वय ३९, रा. कोथरुड) यांनी अलंकार पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार आयटी ऍक्ट व फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला नम्रता डहाणूकर कॉलनीत राहाण्यास आहेत. काही दिवसांपुर्वी त्यांना आयडिया कंपनीतून बोलत असल्याचा फोन आला होता. त्याने नम्रता यांना सीमकार्ड अपग्रेड करण्यास सांगितले. त्यानंतर सायबर चोरट्याने नम्रता यांना अ‍ॅप डाउनलोड करण्यास सांगून बँकेची गोपनीय माहिती चोरली. त्यांच्या बँकखात्यातून २ लाख २५ हजार रुपये वर्ग करुन सायबर चोरट्याने फसवणूक केली आहे. याप्रकरणी पोलीस निरीक्षक राजेश तटकरे अधिक तपास करीत आहेत.