Pune Vadgaon Sheri Crime | पुणे : सावत्र बापाकडून अल्पवयीन मुलीसोबत गैरवर्तन, पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Vadgaon Sheri Crime | पुण्यातील वडगवा शेऱी येथे सावत्र बापाने अल्पवयीन मुलीचा विनयभंग (Molestation Case) केल्याची धक्कादायक घटना समोर आहे. ही घटना गुरुवारी (दि.22) दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास पीडित मुलीच्या घरात घडली आहे. पोलिसांनी आरोपी नराधम बापावर पोक्सो कायद्यांतर्गत (POCSO Act) गुन्हा दाखल करुन अटक केली आहे.

याबाबत 17 वर्षीय पीडित मुलीने चंदननगर पोलीस ठाण्यात (Chandan Nagar Police Station) फिर्याद दिली आहे. यावरुन 48 वर्षीय सावत्र बापावर आयपीसी 354, 354(अ), 323, 504 सह पोक्सो अॅक्ट नुसार गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी पीडित मुलाचा सावत्र बाप आहे. गुरुवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास मुलगी अंघोळ करु किचनमध्ये कपडे बदल होती. त्यावेळी आरोपीने किचनचा दरवाजा वाजवून जेवण करायचे आहे सांगितले.(Pune Vadgaon Sheri Crime)

मुलीने कपडे बदलल्यानंतर दरवाजाची कडी काढून दरवाजा उघडला.
त्यावेळी आरोपीने किचनमध्ये येऊन पीडित मुलीला शिवीगाळ करुन तिच्यासोबत अश्लील वर्तन करुन तिच्या स्त्री
मनास लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले. घाबरलेल्या मुलीने आरडा ओरडा केला असता तिची आई व शेजारी घरात आले. आरोपीने मुलीला व तिच्या आईला शिवीगाळ करुन हाताने मारहाण केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नागवडे करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Raj Thackeray-Manohar Joshi | मनोहर जोशींच्या निधनानंतर राज ठाकरेंचा शोकसंदेश, ”शिवसैनिकाला मुख्यमंत्रिपदावर बसवण्याचं बाळासाहेबांचं स्वप्न…”

BJP MP Raksha Khadse | नाथाभाऊंच्या भाजपा घरवापसीबाबत रक्षा खडसेंचे सूचक वक्तव्य, ”बरेच लोकांचीही इच्छा…”

पिंपरी : जुन्या भांडणाच्या कारणावरुन तरुणावर कोयत्याने वार, वाकड परिसरातील घटना; तिघांना अटक

Lok Sabha Election 2024 | पिंपरी : जास्त बुथ संख्या असलेल्या मतदान केंद्रांची पोलीस आयुक्तांकडून पाहणी

Chhagan Bhujbal Vs Manoj Jarange Patil | ”…तर मनोज जरांगेंवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा”; छगन भुजबळांची मागणी, प्रकरण काय?