Pune : रस्त्याचे खोदकाम करणाऱ्यांवर वरदहस्त कोणाचा ? पुणे-नगररोड वरील प्रकार

चंद्रकांत गोविंद वारघडे अध्यक्ष -माहिती सेवा समिती

शिक्रापुर : वाघोली येथून शिक्रापूर पर्यंत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने पुणे-नगर महामार्गाच्या( Pune Nagar Road) सहापदरी करणाचे काम जोरदार सुरू आहे. हे काम करत असताना अनेक ठिकाणी पावसाळी गटार लाईन फूटपाथ याची उभारणी करण्यात येणार आहे. तर काही ठिकाणी रस्त्याचे ( Pune Nagar Road) रुंदीकरण आणि साइट पट्ट्याचे काम देखील पूर्ण झाले आहे. त्यानंतर त्या ठिकाणी खाजगी कंपनी कडून केबल टाकण्यासाठी पुन्हा या रस्त्याचे व साईड पट्ट्यांचे खोदकाम केले जात आहे.हे सर्व होत असताना, डोळ्याला दिसत असताना देखील सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी मात्र गप्पच असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

Pune : मोक्क्याच्या गुन्हयात फरार असलेला अन् ठोंबरे टोळीचा मुख्य सुत्रधार सुरज ठोंबरला हैदराबाद येथून अटक; आंदेकर टोळीतील एकाच्या खुनाचा केला होता प्रयत्न

याबाबत वेळोवेळी सामाजिक कार्यकर्त्यांनी आवाज उठवला आहे. परंतु त्यांच्यावर देखील दबाव आणून त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे. मागील आठवड्यातच शिरूर-हवेलीचे आमदार अशोक पवार यांनी वाघोली मधील फुटपाथचे खोदकाम केलेल्या ठिकाणची पाहणी करून खोदकाम केल्याप्रकरणी संबंधितावर गुन्हे दाखल करण्याबाबत वरिष्ठांना आदेश दिले होते. माञ या आदेशाला देखील या संबंधित अधिकाऱ्यांनी केराची टोपली दाखवल्याचे वाघोली परिसरात बोलले जात आहे.

‘हे’ 3 आसन दररोज केल्यामुळं होतो प्रचंड फायदा, जाणून घ्या

आता देखील पुणे-नगर महामार्गावरील तुळापूर फाट्याच्या पुढे टोलनाक्याच्या अलीकडे केबल टाकण्यासाठी साईड पट्ट्यांचे खोदकाम चालू आहे. परंतु हे काम देखील सार्वजनिक बांधकाम विभागाला दिसते नाही. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या कर रुपी पैशातून तयार केलेल्या शासकीय रस्त्याचे नुकसान केल्याप्रकरणी गुन्हा दाखल होणार का? आणि हा गुन्हा नक्की कोण दाखल करणार?

Pune : कुविख्यात शाम दाभाडे टोळीचा सदस्य अन् मोक्क्यात फरार असलेल्या आरोपीला गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाकडून अटक

हा देखील प्रश्न सर्व सामान्य नागरिकांना पडला आहे. याबाबत संबंधित सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने या रोडचे काम पाहणाऱ्या शाखा अभियंत्याशी संपर्क केला असता त्यांनी प्रतिक्रिया देण्यास टाळाटाळ केली तर मी सुट्टीवर असल्याचे सांगत बोलण्यास नकार दिला.

पोटाची चरबी कमी करायची असेल तर आहारात समाविष्ट करा ‘ही’ 5 फळे, जाणून घ्या

त्यामुळे शासकीय मालमत्तेचे नुकसान करून केबल टाकण्यासाठी खोदकाम करणाऱ्या ठेकेदाराला अभय नक्की कोणाचे ? या ठेकेदारांवर वरदहस्त कोणाचा? हा प्रश्न आता या निमित्ताने उपस्थित होत आहे

Blood Clot : हात-पायात वेदनांसह ‘या’ 8 लक्षणांकडे करू नका दुर्लक्ष, ब्लड क्लॉटचे आहेत संकेत

पुणे नगररोडवर बेकायदेशीरपणे फुटपाथ तसेच साइट पट्ट्या खोदुन केबल टाकणार्‍या ठेकेदारावर गुन्हा दाखल झाला पाहिजे अन्यथा माहिती सेवा समितीचे माध्यमातून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येईल .
जनतेच्या पैशाने केलेल्या रस्त्याचे अशाप्रकारे नुकसान होत असेल तर ते आम्ही सहन करणार नाही .

चंद्रकांत गोविंद वारघडे अध्यक्ष -माहिती सेवा समिती

विमा धारक हरवल्यास कुटुंब या 4 पध्दतीनं मिळवू शकतं विम्याचा हक्क, जाणून घ्या

संबंधित कामाबाबत सर्वजण एकमेकावर ढकलाढकली करून टाळाटाळ करत असल्याचे चित्र यानिमित्ताने दिसत आहे.
त्यामुळे यामध्ये कुठे तरी पाणी मुरत असल्या बाबत नागरिकांमध्ये चर्चा रंगू लागल्या आहेत.

 

प्रत्येकवेळी पचनक्रिया बिघडते तर एकदा ‘हे’ उपाय करून पाहा, जाणून घ्या