भरधाव वाहनाच्या धडकेत पादचारी तरुणाचा मृत्यू

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – भरधाव वाहनाने दिलेल्या धडकेत पादचारी तरुणाचा मृत्यू झाला. रविवारी दुपारी पावणेदोन वाजण्याच्या सुमारास धानोरीतील मुंजाबा वस्ती परिसरातील रस्त्यावर ही घटना घडली.

राहूल गणपतराव जामनिक (वय 40, रा. कळस, आळंदी रस्ता) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी वर्षा राहूल जामनिक (वय 36) यांनी विश्रांतवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राहूल एका खासगी कंपनीत नोकरी करत होता. रविवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास तो धानोरीतील मुंजाबा वस्ती परिसरातील रस्त्यावरुन चालत चालले होते. त्यावेळी अज्ञात वाहनचालकाने दिलेल्या धडकेत ते खाली पडले. त्यामुळे गंभीररित्या जखमी झाल्यामुळे राहूलचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक निकम अधिक तपास करीत आहेत.