Punit Balan Group | तिसरी ‘एस. बालन T-20 लीग’ अजिंक्यपद क्रिकेट स्पर्धा ! एमईएस इलेव्हन, गेम चेंजर्स इलेव्हन, पुनित बालन ग्रुप, केदार जाधव क्रिकेट अ‍ॅकॅडमी संघ उपांत्य फेरीत

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुनित बालन ग्रुप (Punit Balan Group) तर्फे आयोजित तिसर्‍या ‘एस. बालन टी-२० लीग’ अजिंक्यपद आंतरक्लब क्रिकेट स्पर्धेत एमईएस इलेव्हन संघ, गेम चेंजर्स इलेव्हन, पुनित बालन ग्रुप संघ आणि केदार जाधव क्रिकेट अ‍ॅकॅडमी या संघांनी सर्वाधिक गुण मिळवत स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. (Punit Balan Group)

 

मुंढवा येथील लिजंडस् स्पोर्टस् क्लब मैदानावर सुरू असलेल्या स्पर्धेत हर्ष संघवी याच्या ६६ धावांच्या खेळीच्या जोरावर एमईएस इलेव्हन संघाने केदार जाधव क्रिकेट अ‍ॅकॅडमी संघाचा पराभव करून सलग पाचवा विजय मिळवला. पहिल्यांदा फलंदाजी करताना एमईएस इलेव्हन संघाने २० षटकात ७ गडी गमावून १८१ धावांचे आव्हान उभे केले. हर्ष संघवी (६६ धावा) आणि जय पांडे (५४ धावा) यांनी संघाच्या डावाला आकार दिला. या आव्हानाला उत्तर देताना केदार जाधव क्रिकेट अ‍ॅकॅडमीचा डाव ९७ धावांवर आटोपला. एमईएस संघाच्या दिपक डांगी (३-०) आणि आयुष काब्रा (२-१६) यांनी चमकदार गोलंदाजी केली. (Punit Balan Group)

 

राकेश मते याच्या गोलंदाजीच्या जोरावर एसके डॉमिनेटर्स संघाने जिनवानी इलेव्हन संघाचा १४ धावांनी पराभव करत चौथा विजय मिळवला. पहिल्यांदा फलंदाजी करताना एसके डॉमिनेटर्स संघाने १६.५ षटकात १७४ धावांचे आव्हान उभे केले. अक्षय पांचारीया (३५ धावा), सागर सिंग (३० धावा) आणि अजय बोरूडे (२५ धावा) यांच्या फलंदाजीमुळे संघाने पावणे दोनशे संघाचे आव्हान उभे केले. याला उत्तर देताना जिनवानी इलेव्हन संघाचा डाव १६० धावांवर मर्यादित राहीला. हिमांशु अगरवाल याने ७० धावांची खेळी केली. एसके संघाच्या राकेश मते याने (३-३२) आणि शुभम खटाळे (२-१०) यांनी अचूक गोलंदाजी करून संघाचा विजय सोपा केला.

 

सामन्याचा संक्षिप्त धावफलकः गटसाखळी फेरीः

१) एमईएस इलेव्हनः २० षटकात ७ गडी बाद १८१ धावा (हर्ष संघवी ६६ (२८, ११ चौकार, ३ षटकार), जय पांडे ५४ (४४, २ चौकार, २ षटकार), रिषी अग्रहार ३-२५, वैभव विभुते २-२०) वि.वि. केदार जाधव क्रिकेट अ‍ॅकॅडमीः १५.५ षटकात १० गडी बाद ९७ धावा (विशाल भिलारे ३०, दिग्विजय जाधव १२, दिपक डांगी ३-०, आयुष काब्रा २-१६); सामनावीरः हर्ष संघवी;

 

२) एसके डॉमिनेटर्सः १६.५ षटकात १० गडी बाद १७४ धावा (अक्षय पांचारीया ३५, सागर सिंग ३०, अजय बोरूडे २५, हिकांत कामदार २-२३, सुरज दुबळ २-२४) वि.वि. जिनवानी इलेव्हनः १९.३ षटकात १० गडी बाद १६० धावा (हिमांशु अगरवाल ७० (३८, ९ चौकार, ३ षटकार), हिकांत कामदार २५, पवन आनंद २२, राकेश मते ३-३२, शुभम खटाळे २-१०); सामनावीरः राकेश मते.

 

Web Title :- Punit Balan Group | The third ‘s. Balan T-20 League Cricket Championship! MES XI, Game Changers XI, Puneet Balan Group, Kedar Jadhav Cricket Academy team in semifinals

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा