Pune Crime | पुण्यात गुन्हेगारांची हातात कोयते घेऊन नागरिकांना मारहाण ! पाया पडायला लावून परिसरात पसरवली दहशत; व्हिडीओ केला व्हायरल

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | पुणे शहरात गुन्हेगारीचे (Pune Criminals) प्रमाण वाढत असून गुन्हेगारांकडून सामान्य नागरिकांना वेठीस धरले जात असल्याचा धक्कादायक प्रकार एका व्हायरल व्हिडीओमुळे (Viral Video) समोर आला आहे. पुणे शहर विद्येचं माहेर घर म्हणून ओळखलं जात असलं तरी वाढत्या गुन्हेगारीमुळे पुणे शहर (Pune Crime) हे गुन्हेगारांचे शहर म्हणून ओळखले जाते की काय अशी भीती पुणेकरांकडून व्यक्त होत आहे. पुण्यात हातात कोयते घेऊन नागरिकांना मारहाण केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल होत असून पोलीस (Pune Police) गुंडांकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. मात्र, सध्या या व्हिडीओमुळे पुणे पोलीस दल अ‍ॅक्शन मोडमध्ये आलं आहे.

 

सोशल मीडियात व्हायरल होणारा व्हिडीओ पुण्यातील (Pune Crime) बालाजीनगर (Balaji Nagar) परिसरातील असून परिसरात धारदार हत्यारं घेऊन दहशत पसरवली जात आहे.
हातात कोयते घेऊन मारहाण केली जात आहे.
फुकट भाजी दिली नाही म्हणून मारहाण करुन लोकांना पाया पडायला लावलं जात आहे.
आणि या घटनेचा व्हिडीओ व्हायरल करुन दहशत पसरवली जात आहे.
या व्हिडीओमुळे पुणे पोलीस दल अ‍ॅक्शन मोडमध्ये आलं आहे.

पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta) यांच्या आदेशानंतर अप्पर पोलीस आयुक्त (Addl CP, Pune), पोलीस उपायुक्त (DCP), सहायक पोलीस आयुक्त (ACP) तसेच वरिष्ठ अधिकारी सहकारनगर पोलीस ठाण्यात (Sahakar Nagar Police Station) तळ ठोकून बसले आहेत.
व्हायरल व्हिडीओमध्ये दिसणाऱ्या काही गुंडांची पोलिसांकडून धरपकडही सुरु झाली आहे.
पोलिसांनी आतापर्यंत दोन जणांना अटक (Arrest) केली आहे.
तर त्यांच्या इतर साथिदारांचा ठावठिकाणा शोधला जात आहे.
या गुन्हेगारांवर तडीपारीची कारवाई सुरु करण्यात आली असताना याच गुंडांनी काल भाजी विक्रेत्या महिलेला बेदम मारहाण (Beating) केली.
या घटनेचा व्हिडीओ समोर आल्यानंतर संबंधित गुन्हेगारांवर कडक कारवाई केली जाईल असे पोलीस उपायुक्त सागर पाटील (DCP Sagar Patil) यांनी सांगितले.

 

पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पुणे जिल्ह्यातील फक्त आणि फक्त क्राईमच्या बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा 

 

Web Title :- Pune Crime | Sahakar Nagar In Pune criminals beat citizens with sickles Terror spread in the area by forcing the foundation to fall The video went viral

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा