काय सांगता ! होय, भारतात ‘या’ राज्यात उद्यापासून दारूची विक्री सुरू, राज्य सरकार करणार ‘होम डिलिव्हरी’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – बुधवारपासून पंजाबमध्ये दारूची विक्री सुरू होणार आहे. देशभरात कोरोना विषाणूमुळे लागू असलेल्या लॉकडाऊनमुळे राज्यात दारू विक्री बंद झाली होती. सायंकाळी सहा वाजेपर्यंत राज्यात होम डिलिव्हरी करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. स्थानिक प्रशासन जिल्ह्यात दारूच्या घरपोच प्रक्रियेचा निर्णय घेणार आहे. पंजाबमध्ये आतापर्यंत 1233 कोरोनाचे रुग्ण आढळले असून त्यापैकी 23 जणांचा मृत्यू झाला आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कर्फ्यू दरम्यान, ज्या दुकानांना सकाळी 9 ते दुपारी 1 वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी दिली आहे त्यामध्ये दारूची दुकाने उघडण्यास देखील परवानगी दिली जाईल आणि त्यानंतर संध्याकाळी 6 वाजेपर्यंत दारूची होम डिलीव्हरी करता येऊ शकते.

दारू व्यापाऱ्यांनी सरकारकडे होम डिलिव्हरीची परवानगी मागितली आहे त्याचबरोबर सरकारला दिलेले परवाना शुल्क कमी करण्याची मागणी केली आहे. ते पाहता पंजाब सरकार होम डिलिव्हरी परवानगी मंजूर करू शकते परंतु अंतिम निर्णय 7 मे रोजी घेण्यात येईल.

लॉकडाऊनच्या तिसऱ्या टप्प्यात केंद्र सरकारने काही प्रमाणात शिथिलता आणली आहे, त्या अंतर्गत ही दुकाने उघडण्यात आली आहेत. 4 मे रोजी देशात अनेक ठिकाणी दुकाने उघडण्यात आली जिथे नियमांचे उघड उल्लंघन झाले आहे आणि त्यानंतर स्थानिक प्रशासनाने दुकाने बंद केली.