प्रभू श्रीरामांच्या डोक्यावर भगवी पगडी घाला : मोदींना लगावला ठाकरे शैलीत टोला 

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राम मंदिर प्रश्नावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासहीत भाजपावर  पुन्हा निशाणा साधला आहे. शिवसेनेचे मूकपत्र असलेल्या  सामना संपादकीयमधून त्यांनी भाजपाचा चांगलाच समाचार घेतला आहे. ”राममंदिरासाठी साधू, संत व करसेवकांचे बलिदान झाले आहे. गुजरातेत ‘गोध्रा कांड’ घडले तेसुद्धा रामभक्तांचे बळी गेल्यामुळेच. त्यामुळे संसदेच्या मैदानात राममंदिरावर चर्चा होऊ द्या. तिहेरी तलाक, ऍट्रॉसिटी अशा विषयांवर संसदेत चर्चा होते. घटना दुरुस्ती करून नवा कायदा केला जातो. मग प्रभू श्रीराम संसदेच्या पायरीवर बेवारस अवस्थेत का उभे आहेत? अयोध्येतील रामाचा उद्धार सरकार कधी करणार? लांगुलचालनाच्या राजकारणाने राममंदिराचा मार्ग खूप काळापासून रोखून धरला होता, असे श्री. मौर्य आता म्हणतात. पण हा मार्ग जनतेने खुला करून दिल्यावरही राममंदिर का होत नाही? प्रभू श्रीरामांच्या डोक्यावरही भगवी पगडी घाला. देशाची ‘मन की बात’ आम्ही पुन्हा बोलून दाखवत आहोत”, अशा शब्दांत त्यांनी भाजपाला खडेबोल सुनवाले आहेत.
सुरुवातीला लोकसभा निवडणूक जिंकून आपल्या विजयीरथ जवळपास सगळ्या राज्यातुन फिरवला. अपेक्षा पेक्षा जास्त यश पदरी पडलं, अनेक विधानसभा काबीज केल्या, ५०हुन  अधिक काळ राज्य केलेल्या काँग्रेसला पराभवाला सामोरे जावे लागले.  घटक पक्षांची साथ, संघाच्या मुशिद्दीत तयार झालेली मोदी- शहा यांची जोडीने संपूर्ण देश पिंजून काढला, ते करत असताना त्यातूनच हिंदुत्वाला एक नवे लागले असे म्हंटल तर ते  वावगे ठरणार नाही, यातूनच एक नवं  हिंदुत्व तयार झालं. याच प्रत्यय कित्येक वेळा देशाने अनुभवाला आहे.
2014 मध्ये भाजपास संपूर्ण बहुमत मिळाले व सर्वाधिक जागा उत्तर प्रदेशात मिळाल्या. शिवसेनेसह अनेक पक्ष राममंदिरप्रश्नी भाजपच्या मागे आहेत. त्यामुळे त्यांना मंदिर उभारण्याचा कायदा करून घेण्यात कोणतीच अडचण नव्हती. आज संसदेत तुम्हाला बहुमत आहे. 2019 मध्ये संसदेत काय चित्र असेल ते कोणीच सांगू शकत नाही. त्यामुळे राममंदिराचा कायदा होईल तो आताच व त्यासाठी संसदेचे दोन दिवसांचे विशेष अधिवेशन घ्यावे लागले तरी हरकत नाही. ज्यांना राममंदिर अयोध्येत हवे आहे ते भाजप, शिवसेना वगैरे पक्षांचे खासदार या विशेष अधिवेशनाचे कोणतेही भत्ते वगैरे घेणार नाहीत. त्यामुळे रामाच्या बाजूने कोण व बाबराचे भक्त कोण याचा फैसला संसदेतच होऊ द्या असंही उद्धव ठाकरे बोलले आहेत. पुढे म्हणाले  स्वातंत्र्य दिनाच्या सोहळय़ात पंतप्रधान मोदी यांनी भगवी पगडी घालून भाषण केले. त्या पगडीमागे काय दडलंय? रामप्रभू वनवासातच आहेत आणि आम्ही फक्त भगव्या पगडय़ा घालत आहोत. खरे म्हणजे ‘राममंदिर होईपर्यंत डोक्यावर भगवी पगडी घालणार नाही’ असे आता पंतप्रधान मोदी यांनी सांगायला हवे.
अयोध्येतील रामाचा उद्धार सरकार कधी करणार? लांगुलचालनाच्या राजकारणाने राममंदिराचा मार्ग खूप काळापासून रोखून धरला होता, असे श्री. मौर्य आता म्हणतात. पण हा मार्ग जनतेने खुला करून दिल्यावरही राममंदिर का होत नाही? तेव्हा बेगडी निधर्मीवाल्यांनी रोखले, पण आता तुम्हाला कोण रोखत आहे? प्रभू श्रीरामांच्या डोक्यावरही भगवी पगडी घाला. देशाची ‘मन की बात’ आम्ही पुन्हा बोलून दाखवत आहोत.