Video : भारतात ‘या’ ठिकाणच्या क्वारंटाईन सेंटरमध्ये स्वयंपाक्यानं केला ‘अफलातून’ डान्स, व्हायरल होतोय व्हिडीओ

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : असं म्हणतात की माणसाचे कौशल्य हे कधीच लपून रहात नाही मग परिस्थिती काहीही असो, आपले कौशल्य आपली एक वेगळी ओळख निर्माण करते. अशीच एक घटना बिहारच्या कटिहार जिल्ह्यातून समोर आली आहे. येथील कै. लक्ष्मण मंडल माध्यमिक हायस्कूल सुजापूरच्या क्वारंटाईन सेंटरच्या कुकचा डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

या क्वारंटाईन सेंटरमध्ये जेवण बनविणाऱ्या रिंकूचा डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर खळबळ उडवत आहे. या व्हिडिओमध्ये रिंकू किशोर कुमारच्या ‘एक चतुर नार’ या प्रसिद्ध गाण्यावर डान्स करत आहे. रिंकूची जेवणाच्या सेवेबरोबरच स्थलांतरित मजुरांच्या करमणुकीची ही पद्धत लोकांना खूप आवडत आहे.

पहा रिंकूचा जबरदस्त डान्स

रिंकूला लहानपणापासूनच आहे डान्सची आवड

स्थलांतरित मजुरांसाठी क्वारंटाईन सेंटरमध्ये जेवण बनविणारे रिंकू जवळच एक हॉटेल चालवतात. रिंकूला लहानपणापासूनच डान्स करायला खूप आवडायचे. ते म्हणतात की क्वारंटाईन सेंटरमधील स्थलांतरित मजूर खूप अस्वस्थ असतात, अशा परिस्थितीत ते लोकांच्या विनंतीवरून जेवण तयार झाल्यानंतर डान्स करून लोकांचे मनोरंजन करतात. यामुळे मजुरांसोबत त्यांनाही खूप आनंद मिळतो. रिंकू म्हणतात की जर संधी मिळाली तर त्यांना आणखी पुढे या दिशेने आपले कौशल्य दाखवायला आवडेल.

दरम्यान बिहारमध्ये कोरोनाचे आतापर्यंत एकूण 4,915 रुग्ण आढळले आहेत. त्यामध्ये 2,460 सक्रिय प्रकरणे आहेत. या साथीमुळे राज्यात आतापर्यंत 30 लोकांचा मृत्यू झाला आहे.