औरंगाबाद नामांतराच्या प्रश्नावर सुशीलकुमार शिंदे म्हणाले ‘नो कमेंट’

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाइन – औरंगाबादचे (Aurangabad) नामकरण करुन संभाजीनगर नाव देण्याचा विषय चिघळत चालला आहे. शिवसेनेची आग्रही भूमिका असताना त्याला काँग्रेसने (Congress) विरोध केला आहे. यावरुन विरोधकांनी काँग्रेस (Congress)  आणि शिवसेनेला (Shivsena) टार्गेट करीत आरोपींच्या फैरी झाडत आहेत. यासंदर्भात काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi), राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar), शिवसेनेचे उद्धव ठाकरे हे एकत्र बसून निर्णय घेतील असे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी स्पष्ट केले. यावर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे ( former union minister sushilkumar) यांनी बोलण्यास नकार देत ‘नो कॉमेंट’ म्हणून या विषयावरून हात झटकले. औरंगाबाद शहराचे नामकरण संभाजीनगर करण्याची मागणी विरोधकांकडून होत आहे. या पार्श्वभूमीवर सुशीलकुमार शिंदे ( former union minister sushilkumar) यांनी आपण या विषयावर काहीच बोलणार नाही, असे स्पष्ट केले आहे. तर दुसरीकडे, काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे (Praniti Shinde) यांनी देखील मौन बाळगले आहे. दरम्यान, नामकरणावरुन विरोधकांकडून महाविकास आघाडीमध्ये फूट पाडण्याचे प्रयत्न केले जात असल्याचा आरोप होत आहे. यावर काँग्रेसचे वरिष्ठ नेते आपल्या आमदारांची बैठक घेणार असल्याची चर्चा आहे.

सध्या राज्यात ग्रामपंचायत निवडणुकांचे (Gram Panchayat elections) वारे वाहू लागले आहे. त्यामुळे ग्रामपंचायत निवडणुकीनंतर (Gram Panchayat elections) महाविकास आघाडी ( Mahavikas Aghadi)  नामकरणावर स्पष्ट भूमिका घेईल, असे राजकीय विश्लेषक सांगत आहेत.

ग्रामपंचायत निवडणुकीत आघाडीची सावध भूमिका

सध्या राज्यात 14 हजारांहून अधिक ग्रामपंचायत निवडणुका (Gram Panchayat elections)  होत आहेत. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना (Congress, NCP and Shiv Sena) नेत्यांनी स्पष्ट भूमिका घेतलेली नाही, असे पहायला मिळत आहे. राज्यात सत्तेत असलेले तीन पक्ष ग्रामपंचायत निवडणूक स्वतंत्रपणे लढवत आहेत. याच पार्श्वभूमीवर औरंगाबाद आणि नगर जिल्ह्याच्या नामकरणाच्या प्रश्नावर महाविकास आघाडीतील ( Mahavikas Aghadi) कोणत्याच पक्षाने स्पष्ट भूमिका घेतली नाही. तर या उलट विरोधी पक्ष असलेल्या भाजपने आक्रमक भूमिका घेत महाविकास आघाडीला ( Mahavikas Aghadi) कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करत टीका करण्याचा सपाटा लावला असल्याचे पहायला मिळत आहे.