बाळासाहेब थोरात यांची काँग्रेस विधिमंडळ नेतेपदी निवड

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – माजी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिल्यानंतर रिक्त झालेल्या काँग्रेसच्या विधिमंडळ नेतेपदी आज बाळासाहेब थोरात यांची निवड करण्यात आली आहे. याआधी विधानसभेतील गटनेतेपद आणि विधिमंडळ गटनेते पद ही दोन्ही पदे राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडेच होती. याचबरोबर अनेक नेत्यांची विविध पदांवर नेमणूक करण्यात आली आहे. यामध्ये नसीम खान यांची विधानसभेच्या उपनेतेपदी, मुख्य प्रतोदपदी बसवराज पाटील तर प्रतोदपदासाठी के. सी. पाडवी, सुनील केदार, जयकुमार गोरे, यशोमती ठाकूर, प्रणिती शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. हे सर्व करताना काँग्रेसने जातीय समीकरणे ठेऊन नियुक्त्या केल्या आहेत. त्यामुळे कोणताही समाज नाराज होणार नाही याची देखील काळजी काँग्रेसने घेतली आहे. तर विजय वडेट्टीवार यांची विधानसभा गटनेतेपदी निवड करण्यात आली आहे.

दरम्यान, विधानसभा अधिवेशनाच्या तोंडावर गुरुवारपासून मुंबईत विभागनिहाय बैठकांना सुरुवात झाली आहे. त्याआधी माजी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी आपल्या पदाचा राजीनामा देत भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र त्यांचा भाजप प्रवेश कधी होतो याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. त्याचवेळी विखे पाटील यांचे कट्टर राजकीय बाळासाहेब थोरात यांची या पदावर निवड करत काँग्रेसने एका दगडात दोन पक्षी मारल्याची चर्चा सध्या रंगात आहे. त्याचबरोबर माण-खटावचे आमदार जयकुमार गोरे हेदेखील काँग्रेस सोडण्याच्या तयारीत असताना त्यांना या पदावर निवडून काँग्रेसने त्यांना एकप्रकारे थांबण्याचा इशारा केला आहे.

आरोग्य विषयक वृत्त

जागतिक रक्तदान दिन : गरिबांचा कैवारी ‘अनिल लुणिया’

किहोल सर्जरी ‘ब्रेन ट्युमर’ काढण्यासाठी फायदेशीर

जाणून घ्या ‘केमोथेरेपी’ म्हणजे नेमकं काय ?