लोकगायिका सुषमा नेकपूरची गोळ्या झाडून हत्या

ग्रेटर नोएडा : वृत्तसंस्था – लोकगायिका सुषमा नेकपूर हिची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. ग्रेटर नोएडाच्या मित्रा सोसायटीनजिक मंगळवारी रात्री ही घटना घडली. यापूर्वी 19 ऑगस्टलाही एका गावात गाण्याच्या कार्यक्रमासाठी गेली असता तिच्यावर जीवघेणा हल्ला झाला होता.

मंगळवारी साडे आठच्या सुमारास मित्रा सोसायटीत गाडीतून उतरत असतानाच दोन बाईकस्वारांनी सुषमावर एकापाठोपाठ एक अशा चार गोळ्या झाडल्या. या हल्ल्यात सुषमाचा जागीच मृत्यू झाला. तिला उपचारासाठी रूग्णालयात भरती करण्यात आले. मात्र त्याआधीच तिचा मृत्यू झाला होता.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुषमाचा चार वर्षांपूर्वी पतीसोबत घटस्फोट झाला होता. तिच्या आधीच्या पतीसोबत वाद सुरु होता. घटस्फोट झाल्यानंतरही तो तिला त्रास देत होता. सुषमाने याबाबत पोलिसांत तक्रार नोंदवली होती. सध्या ती गजेंद्र भाटी नामक व्यक्तिसोबत लिव्ह इनमध्ये राहत होती. तसेच गावात जमिनीवरूनही एका व्यक्तिशी तिचा वाद सुरू होता.

बुलंद शहरच्या नेकपूर या गावात राहणारी सुषमा रागिनी गायिका होती. सध्या ती मित्रा सोसायटीत राहत होती.

Visit : Policenama.com