Rahkeem Cornwall | वेस्ट इंडिजच्या ‘या’ खेळाडूने रचला इतिहास, T-20 मध्ये केली डबल सेंच्युरी

पोलीसनामा ऑनलाईन – Rahkeem Cornwall | वेस्ट इंडिजचा (West Indies) फलंदाज रहकिम कॉर्नवालने (Rahkeem Cornwall) T-20 क्रिकेटमध्ये (T-20 Cricket) इतिहास रचला आहे. त्याने T-20 क्रिकेटमध्ये पहिले द्विशतक (double century) झळकविण्याचा मान पटकावला आहे. यापूर्वी अशी कामगिरी कोणत्याच खेळाडूला जमली नाही. 29 वर्षांच्या रहकिमने बुधवारी रात्री अटलांटा खुल्या T-20 लीगमध्ये अटलांटा फायरकडून (Atlanta Fire) खेळताना 205 धावा केल्या. या खेळीत त्याने 17 चौकार आणि 22 षटकार लगावले.

कोण आहे हकिम कॉर्नवाल?

रहकिमने तीन वर्षांआधी भारताविरुद्ध (India) विंडीज संघात पदार्पण केले होते. त्याच्या लठ्ठपणामुळे त्याने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले होते. त्यावेळी त्याचे वजन 140 किलो व उंची 6.6 फूट होती. रहकिमच्या या खेळीच्या जोरावर अटलांटा फायरने हा सामना 172 धावांनी जिंकला. या सामन्यात अटलांटाने 20 षटकात 1 बाद 326 धावा केल्या. या सामन्यात स्टीव्हन टेलरने (Steven Taylor) 18 चेंडूत 5 षटकार व 5 चौकारांसह 53 धावा केल्या.
समी असलमने 29 चेंडूत 53 धावा केल्या.
यानंतर प्रत्युत्तरदाखल उतरलेल्या स्क्वेअर ड्राईव्ह संघाने 20 षटकात 8 बाद 154 धावा केल्या. (Rahkeem Cornwall)

रहकिम वेस्ट इंडिजकडून केवळ एक कसोटी सामना खेळला आहे. तो स्थानिक T-20 लीग खेळतो.
रहकिमने 66 T-20 सामन्यात आतापर्यंत 147.49 च्या सरासरीने 1146 धावा केल्या आहेत.

Web Title :- Rahkeem Cornwall | 140 kg rahkeem Cornwall double hundred blast in t20

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime | दीड कोटीच्या फसवणुक प्रकरणात अ‍ॅड. सतीश मुळीक, अग्रजीत मुळीक, जितेंद्र भोसले, राम भुजबळ यांच्यावर FIR

Dhanushya Baan-Shivsena | निवडणूक आयोगातील धनुष्यबाण चिन्हाच्या वादावर मोठं अपडेट, शिवसेना आणि शिंदे गटाची प्रतीक्षा वाढली

Sandeep Lamichhane | IPL खेळलेल्या ‘या’ क्रिकेटरला बलात्काराच्या आरोपाखाली अटक

Shivsena Chandrakant Khaire On CM Eknath Shinde | चंद्रकांत खैरेंची एकनाथ शिंदेंवर टीका, म्हणाले – ‘आधी पक्ष फोडला आणि आता घर फोडण्याचं काम सुरुय’