राहुल गांधी म्हणजे ‘गधों का सरताज’ : ‘या’ भाजप नेत्याची वादग्रस्त टीका 

इंदौर : वृत्तसंस्था – निवडणूका सुरु झाल्या की राजकीय वर्तुळात टीकेची झोड उठायला सुरुवात होते. अनेकदा या टीकेतून अगदी पातळी सोडून वादग्रस्त टीका होतानाही दिसून येत असतात. असाच काहीसा प्रकार समोर आला आहे. सध्या कोर्टात राफेल डील प्रकरणी सुनावणी सुरु आहे. गेल्या अनेक दिवसांपासून काँग्रेसकडून मोदींना राफेल घोटाळ्यावरून घेरले जात आहे. अशातच आता राहुल गांधी यांच्यावर टीका करताना मात्र भाजपाचे नेते कैलास विजयवर्गीय यांच्या आमदार असणाऱ्या मुलाची जीभ घसरल्याचे दिसत आहे. राहुल गांधी हे आता पप्पू राहिले नसून ते आता गाढवाचे सम्राट झाले आहेत. अशी वादग्रस्त टीका त्यांनी केली आहे. आकाश विजयवर्गीय असं त्यांचं नाव आहे. आकाश हे मध्य प्रदेशमधील इंदौर मतदारसंघाचे आमदार आहेत.

आकाश विजयवर्गीय म्हणाले की, “यापूर्वी राहुल गांधी यांना पप्पू म्हणून ओळखले जात होते. हे नाव हानीकारक आणि प्रेमळ होते. परंतु आता राहुल गांधी देश विरोधी असल्यासारखे वागत आहेत. त्यामुळे आम्ही त्यांचे नाव बदलत आहेत. त्यांना आजपासून ‘गधों का सरताज’ म्हणून ओळखले जाईल.” असे वादग्रस्त वक्तव्य करत आकाश यांनी राहुल यांच्यावर टीका केली आहे.

काल सुप्रिम कोर्टात राफेल डील प्रकरणी सुनावणी सुरु होती. यादरम्यान राफेल डिलच्या फाईल्स संरक्षण मंत्रालयातून चोरीला गेल्या आहेत अशी माहिती सरकारतर्फे सुप्रिम कोर्टात देण्यात आली. यानंतर आज लगेचच राहुल गांधी यांनी याबाबत पत्रकार परिषद घेतली. राफेल डीलच्या या प्रकरणात मोदी दोषी आहेत त्यामुळे त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे. न्याय हा सगळ्यांना समान असायला हवा. या सर्व प्रकरणाची चौकशी करा. मोदींचीही चौकशी करा. अशी मागणी राहुल यांनी यावेळी केली. यानंतर आकाश यांनी राहुल यांच्यावर आपली तोफ डागली आहे.

धक्कादायक ! डबे सोडून पंचवटी एक्स्प्रेसचं इंजिन पुढे ; मध्य रेल्वेची वाहतूक खोळंबली

‘या’ दिवशी ठरणार रणबीर – आलियाच्या लग्नाची तारीख ! 

देशात टीबीचे प्रमाण सर्वांत जास्त    

पुन्हा एकदा जम्मू येथील बस स्थानकावर ग्रेनेड हल्ला ; 10 जखमी  

भारतातील १२ शहरांवर बॉम्ब हल्ला करण्याचे पाकिस्तानचे नियोजन