राहुल गांधी देशाची फाळणी करतील, ‘या’ अभिनेत्रीचा खळबळजनक आरोप

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – चित्रपटांपेक्षा नेहमीच कोणत्या ना कोणत्या वादामुळे चर्चेत असलेली अभिनेत्री कोयना मित्राने काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर केला आहे. देशाची पहिली फाळणी दहशतवादी बॅरिस्टर जिन्ना यांनी केली, आता दुसरी फाळणी कदाचित राहुल गांधी करतील, असा धक्कादायक आरोप कोयना मित्राने केला आहे.

कोयनाने ट्विटरवरून राहुल गांधींवर हल्लाबोल केला आहे. या ट्विटमध्ये तिने काँग्रेसचा जाहीरनामा हा जिहादचे समर्थन करणारा व जवान व भारतविरोधी असल्याची टीका केली आहे. कोयना मित्राच्या आरोपामुळे नव्या वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

https://twitter.com/koenamitra/status/1113783245630517258

कोयना मित्राने केलेल्या ट्विटमध्ये राहुल गांधींचे केरळमध्ये स्वागत इस्लाम झेंडे फडकावून केल्याचा दावा केला आहे. त्याचा एक फोटो तिने शेअर केला आहे. मात्र कोयनाने शेअर केलाला तो फोटो राहुल गांधींच्या केरळ दौऱ्यावेळचा नसून तो इंडियन युनियन मुस्लीम लिगच्या २०१६ च्या रॅलीचा आहे. यात या लिगचे झेंडे फडकवण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. कोयनाच्या या ट्विटला संमिश्र प्रतिसाद मिळाला असला तरी काही नेटकऱ्यांनी कोयनाला ट्रोल केले असून तिला इंडियन युनियन मुस्लीम लिग हा पक्ष तरी माहीत आहे का, असा सवाल केला आहे.