Rain in Maharashtra | तुळशी धरण क्षेत्रात राज्यातील दुसर्‍या क्रमांकाचा विक्रमी 895 मिमी पाऊस; महाबळेश्वरात 2 दिवसात 980 मिमी

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Rain in Maharashtra | सह्याद्रीच्या पर्वतरांगावर पावसाची गेल्या २ दिवसांपासून जोरदार बॅटिंग सुरु असून महाबळेश्वर, नवजा येथे विक्रमी पावसाची (Rain) नोंद झाली आहे. त्यामुळे कोयना धरणातून (Koyna Dam) नदीपात्रात १० हजार क्युसेक इतके पाणी सोडण्यात येत आहे. त्यामळे कराड शहरासह नदीकाठच्या गावांमध्ये खबरदारीचा इशारा देण्यात आला आहे. तुळशी धरण क्षेत्रात (Tulsi dam area) गेल्या २४ तासात विक्रमी ८९५ मिमी पाऊस (Rain in Maharashtra) पडला आहे.

२६ जुलै २००६ मध्ये मुंबईतील सांताक्रूझ येथे ९४६ मिमीहून अधिक पावसाची नोंद झाली होती. त्यानंतरचा तुळशी धरण क्षेत्रात पडलेला हा दुसर्‍या क्रमांकाचा २४ तासातील विक्रमी पाऊस आहे. महाबळेश्वर येथे काल ४२४ मिमी पावसाची नोंद झाली होती. आज ५५६ मिमी पावसाची नोंद झाली आहे. दोन दिवसात ९८० मिमी पावसाची नोंद झाली आहे. तसेच नवजा येथे ११७३ मिमी पावसाची विक्रमी नोंद झाली आहे. कोयना धरणावर (Koyana Dam)  आज ६१० मिमी पावसाची नोंद झाली असून काल ३४७ मिमी पाऊस पडला होता. दोन दिवसात ९५७ मिमी पाऊस पडला आहे.

कृष्णा खोर्‍यातील सर्वच धरणांच्या परिसरात गेल्या २४ तासात तुफान पाऊस झाला आहे.
वारणावती धरण (Varanavati Dam) परिसरात तब्बल ५७४ मिमी पाऊस झाला असून धरण ९४
टक्के भरले आहे. दुधगंगा धरणावर ४८० मिमी पाऊस झाला आहे. धरण ६७ टक्के भरले आहे.
राधानगरी धरणावर ५६७ मिमी पावसाची नोंद झाली असून धरण ८५ टक्के भरले आहे.

तुळशी धरण परिसरात विक्रमी ८९५ मिमी पावसाची नोंद झाली आहे. धरण ७९ टक्के भरले आहे. कासारी येथे ३२१ मिमी पाऊस पडला असून धरण ८३ टक्के भरले आहे. पाटगाव ४३६ मिमी, धोम बलकवडी ३९९ मिमी, तारळी १९४ मिमी पावसाची नोंद झाली आहे.

हे देखील वाचा

KCC-Kisan credit card | शेतकर्‍यांसाठी मोठी बातमी ! 2 दिवसात करा ‘हे’ काम, अन्यथा किसान क्रेडिट कार्डमधून कापले जातील पैसे; जाणून घ्या

Aadhaar Virtual Id | प्रत्येक ठिकाणी आधार कार्ड घेऊन जाण्याची गरज नाही, मिनिटात बनवा व्हर्च्युअल आयडी आणि करा आवश्यक कामे

ट्विटर ला देखील फॉलो करा

 

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  Rain in Maharashtra | Tulsi dam area has the second highest rainfall of 895 mm in the state; 980 mm in 2 days in Mahabaleshwar

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update