Rain in Pune | पुण्यात पावसाचा जोर, सर्वत्र पाणीच पाणी; पुढील 4 दिवस पावसाचा मुक्काम, हवामान विभागाची अपडेट

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Rain in Pune | काल आयएमडीने (IMD) वर्तवलेल्या अंदाजाप्रमाणे आज पुण्यात पावसाचे (Rain in Pune) आगमन झाले. दुपारी दोन पासून शहर आणि परिसरात पावसाने चांगलाच जोर धरला होता. यामुळे अनेक भागात पाणी साचले होते. रस्त्यावर पाणी साचल्याने वाहन चालकांना कसरत करावी लागत होती. कर्वेनगर, खराडी आदी भागात मोठ्या प्रमाणात पाणी (Rain in Pune) साचले होते. आणखी 4 दिवस पावसाचा मुक्काम असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

राज्यात आज वाऱ्याची चक्रीय स्थिती दक्षिण मध्य महाराष्ट्र व लगतच्या भागावर असल्याने द्रोणीय स्थिती ईशान्य मध्य प्रदेश ते मध्य नैऋत्य बिहार पर्यंत आहे. त्यामुळे पावसाने (Rain in Pune) हजेरी लावली आहे. २४ ते २५ सप्टेंबर रोजी मान्सून सक्रीय ते अतिसक्रीय राहील, अशी माहिती भारतीय हवामान विभागाच्या (Indian Meteorological Department) पुणे विभागाच्या अधिकारी स्मिता आपटे (IMD Officer Smita Apte) यांनी दिली.

राज्यात आज तुरळक ठिकाणी मेघ गर्जनेसह पावसाची तर काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे.
दरम्यान, राज्यात आज नागपूर, नाशिक, पुणे, सातारा जिल्ह्यात दमदार पावसाने हजेरी लावली.
हवामान विभागाने वर्तविलेल्या अंदाजानुसार, २६ तारखेनंतर अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होण्याची
शक्यता असल्याने मान्सून महाराष्ट्रात आणखी सक्रीय होऊ शकतो. २४ ते २६ सप्टेंबर दरम्यान विदर्भ, मध्य महाराष्ट्र,
मराठवाड्यात पाऊस पडू शकतो. तर, २७ तारखेला मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे.

शनिवारी (दि.23) पुण्यात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मेघ गर्जनेसह हलक्या पावसाची शक्यता आहे.
२६ सप्टेंबरला हलक्या स्वरुपाचा, घाट विभागात मुसळधार तर २८ सप्टेंबरला हलक्या स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Pimpri Chinchwad Crime News | महिला डॉक्टरची सातव्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या, डॉक्टर पतीसह चार जणांवर FIR; दिघी परिसरातील घटना