Rain in Pune | पुण्यात अतिवृष्टीचा इशारा! कर्मचाऱ्यांना ‘वर्क फ्रॉम होम’ देण्याचे PMC चे आवाहन

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Rain in Pune | पुणे आणि परिसरात मागील चार ते पाच दिवसांपासून मुसळधार पाऊस (Heavy Rain) पडत आहे. पुणे शहर आणि परिसरात अतिवृष्टीचा (Rain in Pune) इशारा हवामान विभागाने (IMD) दिला आहे. या पार्श्वभूमीवर पुणे महापालिकेने (Pune Municipal Corporation (PMC) पुणे परिसरातील आयटी कंपन्या (IT Companies) तसेच खासगी आस्थापनांना (Private Establishments) आपल्या कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम (Work from Home) ची सवलत द्यावी, असे आवाहन केले आहे.

 

हवामान विभागाने (Meteorological Department) पुणे जिल्ह्यात पुढील दोन दिवस अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवलेली आहे. त्या अनुषंगाने, पुणे महापालिका प्रशासनाकडून शहरातील सर्व खासगी कंपन्या तसेच आयटी कंपन्यांना आवाहन करण्यात आले आहे. कंपन्यांनी सुरक्षिततेच्या व सतर्कतेच्या दृष्टीने कंपनीतील कर्मचाऱ्यांना पुढील दोन दिवस वर्क फ्रॉम होम करण्याची सवलत द्यावी.

 

दरम्यान, हवामान विभागाने पुढील दोन दिवस अतिवृष्टीचा इशारा दिल्याने पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील सर्व शाळांना दोन दिवस सुट्टी (Schools Closed) जाहीर केली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून महापालिका प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. तसेच खाजगी आस्थापनांना देखील आवाहन केले आहे.

 

दरम्यान, पुणे जिल्ह्याला रेड तर शहराला येलो अलर्ट (Yellow Alert) हवामान विभागाने दिला आहे.
पावसामुळे झाडपडीच्या घटना घडण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुणेकरांनी बाहेर न पडता घरीच राहावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
पावसामुळे पुण्यातील धरणे निम्मी भरली आहेत. मागील वर्षाच्या तुलनेत यंदा ही धरणे वेगाने भरली आहेत.
ही धरणे घाटमाथा परिसरात असल्याने लवकर भरणार आहेत. त्यामुळे धरणातून पाण्याचा विसर्ग केला जाणार आहे.

 

Web Title :- Rain in Pune | Warning of heavy rains in Pune! PMC appeals to provide ‘work from home’ to employees

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Rain in Pune | पुण्यातील कात्रज घाटात दरड कोसळली; 15 दिवसातील तिसरी घटना

 

Pune Crime | 10 टक्के व्याजाने पैसे उकळणाऱ्या खाजगी सावकारावर गुन्हे शाखेकडून कारवाई

 

Belly Fat कमी करण्यासाठी खा ‘हे’ 5 फूड्स, नॅचरल पद्धतीने कमी करा पोटाची चरबी; जाणून घ्या