Rainfall Alert | येत्या काही तासात ‘या’ ठिकाणी कोसळणार सरी, हवामान खात्याचा इशारा

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Rainfall Alert | सध्या उत्तर भारतातील (North India) अनेक राज्यांतून थंडी (Cold) गायब झाली आहे. थंडी गायब होताच वातावरणात (Atmosphere) मोठे बदल जाणवू लागले आहेत. काल दिल्लीसह उत्तर भारतातील अनेक राज्यामध्ये वेगवान वाऱ्यासह (Strong Wind) पावसानं (Rain) हजेरी लावली आहे. तर काही ठिकाणी गारपीट (Hailstorm) झाली आहे. रात्री उशिरापर्यंत याठिकाणी वादळी वाऱ्यासह (Gusty wind) हलका (Light) ते मध्य स्वरुपाचा पाऊस (Moderate Rainfall) सुरु होता. आज पुन्हा दिल्लीसह उत्तरेतील काही भागात हवामान खात्यानं (IMD) पावसाचा अंदाज (Rainfall Alert) वर्तवला आहे.

 

आज सकाळपासूनच दिल्लीसह (Delhi) गाझियाबाद (Ghaziabad), नोएडा (Noida) आणि हरियाणाच्या (Haryana) अनेक भागांत ढगाळ हवामानाची नोंद झाली. पुढील काही तासांत या ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या सरी कोसळण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. तसेच 28 फेब्रुवारीपासून उत्तर – पश्चिम भारतात विजांच्या कडकडाटासह (Lightning Strikes) वेगवान वाऱ्याच्या साथीने जोरदार पावसाची शक्यता आहे. 3 मार्चपर्यंत हीच स्थिती कायम (Rainfall Alert) राहणार आहे.

महाराष्ट्रात कोरडे हवामान
महाराष्ट्रात (Maharashtra) मागील दोन आठवड्यापासून कोरड्या हवामानाची (Dry weather) नोंद करण्यात आली आहे. याच काळात तापमानात मोठ्या प्रमाणात चढ – उतार जाणवले आहेत. गेल्या दोन दिवसांत पुण्यासह (Pune) राज्यातील अनेक भागात किमान तापमानात (Minimum Temperature) 2 ते 3 अंश सेल्सिअसची वाढ झाली आहे. आज पुण्यात यंदा प्रथमच किमान तापमानाचा पारा 22 अंशावर गेला आहे. वडगाव शेरी (Wadgaon Sheri) याठिकाणी आज 22.4 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झाली आहे.

 

राज्यातील प्रमुख शहरातील तापमान
पुणे 14.5, बारामती 16.3, रायगड (Raigad) 20.9, रत्नागिरी 20.2, जळगाव (Jalgaon) 13.3, जेऊर 16, अहमदनगर 14.8,
महाबळेश्वर (Mahabaleshwar) 16.6, सातारा (Satara)17.4, उस्मानाबाद (Osmanabad) 16.8, कोल्हापूर (Kolhapur) 20.5,
सोलापूर (Solapur) 21.6, कुलाबा (Colaba) 20.6, सांताक्रूझ (Santa Cruz) 18.8, ठाणे (Thane) 19, परभणी 20.5, औरंगाबाद (Aurangabad) 16.5, माथेरान (Matheran) 18.8 आणि डहाणू येथे 19 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली आहे.

 

Web Title :- Rainfall Alert | rainfall alert in many places know latest weather in maharashtra

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा