Benefits Of Papaya | …म्हणून पपईला म्हंटलं जातं सुपरफूड, जाणून घ्या शरिरास होणार्‍या आश्चर्यकारक फायद्यांबाबत

पोलीसनामा ऑनलाइन टीम – पपई (Papaya) या फळामध्ये विविध प्रकारचे पोषक घटक (Nutrition) असतात. त्यामुळे पपई खाल्ल्याने अनेक गंभीर आजारांपासून दूर राहण्यास मदत होते. पपईमध्ये जीवनसत्त्वे (Vitamins) आणि संयुगे (Compounds) असतात. आहारतज्ज्ञांच्या मते, पपईचे सेवन (Papaya Intake) नियमित करावे, जर तुम्ही काही विशिष्ट आजारांनी ग्रस्त असाल तर. पपईमध्ये अँटी-ऑक्सिडंट्स (Anti-oxidants) जास्त प्रमाणात असल्याने अनेक प्रकारचे गंभीर आजारापासून आपले संरक्षण होते. कोरोना काळात रोगप्रतिकारशक्ती (Immunity) वाढवण्यासाठी पपई हे गुणकारी फळ (Benefits Of Papaya) मानले गेले. पपई व्हिटॅमिन सी (Vitamin C) चे प्रमाण खुप असते. शरीराची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते. पोट (Stomach), पचनसंस्था (Digestive System), त्वचेचा रंग सुधारणं (lighten skin tone) आणि दमा (Asthma) यांसारख्या जुनाट आजारांमध्ये पपईचं सेवन करणं फायदेशीर (Benefits Of Papaya) ठरत.

 

मधुमेही रुग्णांसाठी पपई वरदान (Papaya Is Good For Diabetics)
मधुमेही रुग्णाला (Diabetic Patients) खाण्याबाबत अतिशय सावध राहावे लागते. मधुमेहाच्या रुग्णांसाठी पपई फारच गुणकारी आहे. पहिल्या टप्प्यातील मधुमेहींनी उच्च फायबर आहार (High Fiber Diet) घ्यावा. यामुळे रक्तातील साखरेची पातळी (Blood Sugar Level) कमी होऊ शकते. पपईमध्ये फायबरचं (Fiber) प्रमाण (Benefits Of Papaya) चांगल असत.

तज्ज्ञांच्या मते पपईमध्ये लाइकोपीन कंपाऊंड (Lycopene Compound) असते, ज्यामुळे कर्करोगाचा धोका (Cancer Risk) कमी होऊ शकतो. कर्करोगावर उपचार घेत असलेल्या रुग्णांसाठी पपई फायद्याची आहे. याशिवाय पपईमध्ये अँटीऑक्सिडंट बीटा कॅरोटीनही (Antioxidant Beta Carotene) आढळून येते. बीटा कॅरोटीनयुक्त आहाराचे सेवन केल्यास तरुणांमध्ये प्रोस्टेट कॅन्सरचा (Prostate Cancer) धोका कमी होतो.

 

व्हिटॅमिन सी च्या कमतरतेमुळे हाडांच्या फ्रॅक्चरचा धोका वाढतो. पपईमध्ये व्हिटॅमिन-सी आणि कॅल्शियमचे (Calcium) प्रमाणही चांगले असते.
पपई शरिरातील व्हिटॅमिन सी ची कमतरता दूर करते. बद्धकोष्ठतेची (Constipation) तक्रार आल्यास दररोज पपईचे सेवन करावे.
यामुळे पोट साफ राहते. पोटदुखी, बद्धकोष्ठतेवर पपई गुणकारी आहे. यामुळे त्वचाही निरोगी राहते. डोळे निरोगी राहण्यासाठी पपई खावी.
पपईमुळे शरीरातील पाण्याची कमतरताही दूर होते (Papaya Eliminate Dehydration).

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही. त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं.
अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Benefits Of Papaya | benefits of papaya in marathi papaya good for diabetes cancer weight loss

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Ajit Pawar | ‘पुण्यातील शाळा 2 मार्चपासून सुरु, पालकांना वाटलं तर त्यांनी…’ – अजित पवार

 

Mahashivratri 2022 | भगवान शंकराला पसंत आहे बेलपत्र, ‘या’ आयुर्वेदिक झाडाची पाने चावल्याने दूर होतील Diabetes सारखे 5 गंभीर आजार

 

Ajit Pawar | पुण्यातील जम्बो कोविड रुग्णालय बंद करण्याचा निर्णय – अजित पवार