Raj Thackeray Ayodhya Tour Postponed | राज ठाकरेंचा अयोध्या दौरा तूर्तास स्थगित; स्वत: ट्विटरवरुन दिली माहिती

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Raj Thackeray Ayodhya Tour Postponed | नुकतंच मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांचा अयोध्या दौरा (Ayodhya Tour) कदाचित स्थगित होण्याची शक्यता असल्याची माहिती समोर आली होती. याबाबत अधिकृत घोषणा राज ठाकरे करतील असं देखील सांगण्यात आलं होतं. अखेर या बातमीला पुर्णविराम मिळाला आहे. स्वत: राज ठाकरे यांनी ट्विटरवरुन याबाबत माहिती दिली आहे. तुर्तास अयोध्या दौरा स्थगित असं ट्विट राज ठाकरे यांनी केलं आहे.

पुणे दौऱ्यावर असलेले राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांनी प्रकृतीच्या कारणास्तव आपला दौरा अर्धवट सोडला आणि ते मुंबईला रवाना झाले होते. राज ठाकरे यांच्या पायाला दुखापत झाली असून त्यामुळे शस्त्रक्रीया करावी लागण्याची शक्यता आहे. तर, राज ठाकरे यांच्या प्रकृतीच्या कारणामुळे 5 जूनला होणारा अयोध्या दौरा पुढे ढकलला जाऊ शकतो. अशी बातमी पसरली होती. दरम्यान, आता राज ठाकरे यांचा अयोध्या दौरा स्थगित झाल्याची माहिती खुद्द राज ठाकरे यांनी ट्विटरवरुन दिली. राज ठाकरे यांची तब्बेत ठीक नसल्याने दौरा रद्द करण्यात आल्याचे सूत्रांकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

पुण्यातील सभेमध्ये आपण यावर सविस्तर बोलणार असल्याचं राज ठाकरे यांनी स्पष्ट केलं आहे. राज ठाकरे हे अचानक पुणे दौऱ्यावर मुंबईला परतल्यापासूनच त्यांच्या अयोध्या दौऱ्याबद्दल चर्चांना उधाण आलं होतं. अखेर आज या चर्चांना पूर्णविराम देत राज ठाकरे यांनी दौरा स्थगित झाल्याच्या वृत्तावर शिक्कामोर्तब केलं आहे.

Web Title  : Raj Thackeray Ayodhya Tour Postponed | MNS Chief Raj Thackeray Ayodhya Tour Postponed Now

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

सोन्या-चांदीच्या दरात वाढ की घसरण? जाणून घ्या आजचे ताजे दर

 

Maharashtra Monsoon Updates | मुंबईत 6 जूनला मान्सूनची एन्ट्री? राज्यात ‘या’ तारखेला वरुणराजाचं आगमन होणार; IMD चा अंदाज

 

Pune Municipal Corporation (PMC) | पावसाळा पूर्व कामांना अद्याप म्हणाविशी गती नाही; आयुक्तांनी तीनही अतिरिक्त आयुक्तांकडे सोपविली जबाबदारी

 

Pune PMC Water Supply | सूस, म्हाळुंगे आणि बावधन बुद्रूक मधील पाणी पुरवठा प्रकल्पाचा आराखडा आठवड्याभरात तयार होणार

लवकरच निविदा प्रक्रिया राबवून कामाला सुरूवात केली जाईल – विक्रम कुमार, महापालिका आयुक्त