Raj Thackeray | ‘जातीपातीचं राजकारण हे शरद पवारांनी सुरू केलं’;  राज ठाकरेंची तोफ कडाडली !

मुंबई : पोलीसानामा ऑनलाइन – Raj Thackeray | दोन वर्षांनी मनसेचा गुढी पाडवा (MNS Gudi Padhwa Melava) मेळावा पार पडला. यावेळी बोलताना मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी शिवसेनेसह (Shivsena) मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) टार्गेट केलं. त्यानंतर राज ठाकरेंनी थेट राष्ट्रवादीचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर पुन्हा एकदा जातीच्या मुद्द्यावरून निशाणा साधला.

 

1999 साली राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्मानंतर राज्यात जातीपातीचं राजकारण (Caste Politics) मोठ्या प्रमाणावर सुरू झालं. याच्या आधी जात होती मात्र तेव्हा जातीचा अभिमान होता. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्मानंतर दुसऱ्या जातीबद्दल यांनी द्वेष निर्माण केला. हा या जातीचा तो त्या जातीचा अशी फूट पाडली असल्याचं म्हणत राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी शरद पवारांवर निशाणा साधला.

 

राज ठाकरे यांनी राष्ट्रवादीचे नेते आणि मंंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्यावरही टीका केली. राष्ट्रवादीकडून पहिला मंत्री म्हणून छगन भुजबळ यांनी जाहीर केले गेले. छगन भुजबळ हे स्वातंत्र्यसैनिक नव्हते, दोन-अडीच वर्षे कारागृहात होते. तुमच्या नाकावर टिच्चून हे सर्व करत असल्याचं ठाकरे म्हणाले.

 

दरम्यान, राज ठाकरे यांनी राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक (Nawab Malik) आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh)
यांच्या प्रकरणांवरून पवारांवर टीका केली. राज ठाकरेंच्या टीकेवर राष्ट्रवादीकडून काय प्रत्युत्तर देतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

 

Web Title :- Raj Thackeray | mns raj thackeray slam ncp sharad pawar in mns gudi padawa melawa dadar shivaji park

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Kashmera Shah – Urfi Javed Controversy | पुन्हा कश्मिरा शाहनं उडवली उर्फी जावेदची खिल्ली; म्हणाली – ‘तिकिट खरेदी करून एअरपोर्टवर जात जा..’

 

Janhvi Kapoor Body Surgery | फॅशनच्या नादात जान्हवी कपूर झाली ट्रोल नेटकरी; म्हणाले – ‘गरिबांची काइली जेनर’

 

Pune Crime | धक्कादायक ! पुण्यात दहावीत शिकणार्‍या मुलीचा मृतदेह आढळल्याने प्रचंड खळबळ, घात की अपघात?