Raj Thackeray | अजित पवारांच्या घरी ‘रेड’ पडते मात्र सुप्रिया सुळेंच्या घरी ‘रेड’ पडत नाही – राज ठाकरे

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी आज उत्तरसभेत बोलताना राष्ट्रवादीच्या नेत्यांवर हल्ला चढवला.
राज ठाकरे यांनी गुढी पाडव्या दिवशी मशिदीवरच्या भोंग्यांवरून केलेल्या वक्तव्याप्रकरणी त्यांंच्यावर जोरदार टीका केली होती.
याच पार्श्वभूमीवर बोलताना राज ठाकरेंनी (Raj Thackeray) राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्यावरही टीका केली.

 

मला आश्चर्य या गोष्टीचं वाटतं की एकाच घरात राहून अजित पवारांच्या (Ajit Pawar) घरी रेड पडते, पण तुमच्या घरी रेड (Raid) पडत नाही याचं कारण मला कळेल का ?, असा सवाल राज ठाकरे यांनी केला आहे.
महाराष्ट्रात एक – एक माणूस पोहोचवला की पवार (Sharad Pawar) मोदींची (PM Narendra Modi) भेट घेतात, पुढचा माणूस सांगायला.
देशमुख (Anil Deshmukh) गेले, मग परत एक भेट घेतली. अजितचं काय ? मग रेड टाकल्या. त्यानंतर परत भेट घेतली, नवाब मलिक फाजीलपणा जास्त करतोय.
मग नवाब मलिक. नंतर आता संजय राऊतांवर (Sanjay Raut) बोलले असं म्हणे, असं म्हणत राज ठाकरे यांनी चौफेर फटकेबाजी केली. (Raj Thackeray)

अजित पवारांच्या घरी रेड पडते, त्यांच्या सख्या बहिणींच्या घरी रेड पडते, त्याच्यानंतरही पवार आणि नरेंद्र मोदी यांच्यात मधूर संबंध राहतात कसं काय ?, मी पवारांना कधी भडकलेलं बघितलं नाही, असं राज ठाकरे म्हणाले.
यावेळी बोलताना राज ठाकरेंनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांच्यावरही निशाणा साधला.

 

दरम्यान, मनसे हा विझलेला पक्ष असल्याचं जयंत पाटील म्हणतात.
मात्र, मला त्यांना सांगायचे आहे की, जयंतराव मनसे हा विझलेला पक्ष नाही, हा समोरच्याला विझवत जाणारा पक्ष असल्याचं राज ठाकरे म्हणाले.

 

Web Title :- Raj Thackeray | Raid falls on Ajit Pawars house but Raid does not fall on Supriya Sules house Raj Thackeray

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा