Raj Thackeray | मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी सांगितला ‘फडणवीस’ आडनावाचा ‘अर्थ’

पुणे न्यूज : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) –  महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्वेसर्वा राज ठाकरे (Raj Thackeray) हे पुण्यात (Pune) आले आहेत. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंना (Shivshahir Babasaheb Purandare) वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी राज ठाकरे हे पुण्यात आलेत. त्यावेळी त्यांनी बाबासाहेब पुरंदरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. बाबासाहेबांवर टीका करणाऱ्यांनी स्वत: काही वाचलं नाही. जे ऐकायला मिळतंय त्यातून फक्त राजकारणासाठी आरोप केले. असं राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी म्हटलं आहे. राज यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं आहे. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी सवांद साधला आहे.

काय म्हणाले राज ठाकरे?

मराठीमध्ये वापरल्या जाणाऱ्या शब्दांबाबत शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्याशी झालेल्या चर्चेबाबत राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी सांगितलं आहे की, ‘प्रत्येक भेटीवेळी ते नवीन सांगत असतात. एक शंका त्यांना विचारली होती. ‘निश्चयाचा महामेरु बहुत जनांसी आधारू’ किंवा इतर काही शब्द असे आहेत की जी तेव्हाची मराठी आहे. अनेकदा शब्द तेच असतात फक्त त्यात ‘ळ’ आणि ‘ल’ मध्ये जसे असतात तसे काही फरक आहेत. आपण कैसी च्या जागी कैंची असं लिहलेलं आहे, याविषयावर त्यांच्याशी बोललो असं राज ठाकरे यांनी सांगितलं आहे.

तसेच पुढे बोलताना राज (Raj Thackeray) यांनी फडणवीस (Fadnavis) या शब्दाबद्दल / आडनावाबाबत देखील सांगितलं आहे, ‘मराठी भाषेत असलेल्या इतर भाषांमधील ठिकाणांचे शब्द याबाबत बोलताना राज ठाकरे म्हणाले, ‘आजही अनेक फारसी शब्द आहेत जे आपण वापरतो.
काही अडनावं अशी आहेत ती कुठून आली, त्याचे अर्थ काय याची माहिती नाही.
आत ‘फडणवीस’ आडनाव, तर फडणवीस हे आडनाव नाही. ते एक पर्शियन नाव फर्दनवीस आहे.
फर्द म्हणजे कागद आणि नवीस म्हणजे लिहिणारा.
नंतर फडावरती लिहणारा म्हणून ते फडणवीस झालं, असं राज ठाकरे यांनी सांगितलं आहे.

दरम्यान, आजच्या परिस्थितीत महाराज काय सांगतात ते बाबासाहेब आपल्याला सांगत आलेत.
आज एखादी घटना घडली असेल तर त्या घटनेसोबत ते एक ऐतिहासिक संदर्भ सांगत असतात.
ते सांगायचं काम करतात आपण जाणून घ्यायचं काम करायचं असंही राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.
या दरम्यान बोलताना पुढे राज ठाकरे म्हणाले, ‘परप्रांतियांबाबत भूमिका स्पष्ट केली तर आम्ही विचार करू असं देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले होते, यावरून माझी भूमिका स्पष्टच असल्याचं सांगत फडणवीस यांच्या प्रश्नाला उत्तर दिल आहे.
तसेच, भाजप मनसे (BJP-MNS) युतीच्या चर्चाही त्यांनी फेटाळून लावल्या. असे प्रश्न माध्यमांकडूनच विचारले जातात आणि त्याच्या उत्तरावर चर्चा केली जाते.
उत्तर भारतीयांसाठी केलेल्या भाषणाची क्लिप मी चंद्रकांत पाटील यांना पाठवलेली नाही
असं देखील राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी म्हटलं आहे.

 

Web Title : Raj Thackeray | raj thackeray told the meaning of ‘fadnavis’

LIC Saral Pension Plan | एलआयसीच्या ‘या’ योजनेत गुंतवा एकदाच पैसे आणि मिळवा दरमहा 12 हजार रुपये; जाणून घ्या ‘हे’ 6 फायदे

Union Home Ministry | केंद्राच्या राज्यांना महत्वाच्या सूचना; 31 ऑगस्टपर्यंत निर्बंध कडक ठेवा

Shilpa Shetty | शिल्पा शेट्टीच्या आईची फसवणूक, जुहू पोलीस ठाण्यात FIR दाखल, जाणून घ्या प्रकरण