‘साहेब, तुमचा वाघ गेला हो’ ! ऐकताच स्तब्ध झाले राज ठाकरे, कॉल रेकॉर्डिंग व्हायरल

पोलिसनामा ऑनलाईन – नांदेड जिल्ह्यातील किनवट येथील मनसे कार्यकर्त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. त्यापार्श्वभूमीवर अध्यक्ष राज ठाकरे यांनी जेव्हा सुनिलच्या कुटुंबीयांना फोन केला तेव्हा आक्रोश ऐकून तेही स्तब्ध झाले.

सुनिलच्या भावाने फोन उचलला होता. ’जय महाराष्ट्र, मी, राज ठाकरे बोलतोय’ असे म्हणताच फोन पलिकडून बोलणार्‍या भावाने ’साहेब, तुमचा वाघ गेला हो, खूप प्रेम करायचा तुमच्यावर’ असे म्हणून एकच आक्रोश केला. हे ऐकून राज ठाकरेही काही काळ स्तब्ध झाले. सुनिलच्या जाण्याबद्दल ठाकरे यांनी दु:ख व्यक्त केले. सुनिलने इतक्या टोकाचे पाऊल का उचलले, निदान काही करण्याआधी माझ्याशी तरी बोलायचे, अशी विचापूस केली. लॉकडाउनचा काळ आहे, सध्या सर्वांनी काळजी घ्यावी, एकदा सर्वकाही सुरळीत झाले की, भेट द्यायला येईल, असे आश्वासनही राज यांनी दिले.