कपिल सिब्बलच्या वक्तव्यावर राजस्थानचे CM गहलोत संतापले

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – बिहार विधानसभा निवडणुकीसह इतर राज्यांमध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत कॉंग्रेसचा दारुण पराभव झाला. या निवडणुकीतील पराभवाचे आत्मचिंतन करण्याऐवजी कॉंग्रेसमधील गृहकलह दिवसेंदिवस वाढत आहे. कॉंग्रेस नेते कपिल सिब्बल (kapil sibal) यांच्या मुलाखतीवरून पक्षाचे नेते आणि राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत (ashok gehlot) यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे.

पक्षाचे अंतर्गत मुद्दे माध्यमांमधून मांडू नका (there-was-no-need-for-kapil-sibal-to-mentioned-our-internal-issue-in-media-says-ashok-gehlot) असे ते म्हणाले.
कपिल सिब्बल यांच्या वक्तव्यामुळे कॉंग्रेस कार्यकर्ते दुखावले गेले आहेत, असे अशोक गहलोत म्हणाले. सिब्बल यांनी पक्षाचे अंतर्गत प्रश्न माध्यमांसमोर मांडण्याची गरज नाही. कॉंग्रेस पक्ष 1969, 1977, 1989 आणि 1996 मध्ये वाईट काळातून गेला. पण पक्षाने आपली धोरणं, विचारधारा आणि नेतृत्वावरील विश्वासाच्या जोरावर एक जोरदार पुनरागमन केले आहे. वाईट काळात प्रत्येक वेळी पार्टी अधिक चांगली बनत गेली. यूपीएने 2004 मध्ये सोनिया गांधी यांच्या नेतृत्वात सरकार स्थापन केले. या वेळीही आम्ही परिस्थितीवर मात करू, असे गहलोत यांनी सांगितले आहे.

निवडणुकीतील पराभवाची अनेक कारण असू शकतात. प्रत्येक वेळी पक्षाने नेतृत्व आणि पदाच्या दृष्टीने धैर्य दाखवले आहे तसेच आपण वाईट स्थितीवर विजय मिळवला आहे. वाईट काळात पक्ष खंबीरपणे एकजूट राहिला आहे आणि उभारण्याचेही हेच कारण आहे. आजही कॉंग्रेस हा एकमेव पक्ष आहे जो देशाला एकजूट ठेवू शकतो आणि सतत विकासाच्या मार्गावर जाऊ शकतो, असे गहलोत म्हणाले.

सिब्ब्ल म्हणाले होते
पक्षात संघटनात्मक स्तरावर अनुभवी आणि राजकीय परिस्थितीचे आकलन असलेल्या नेत्याची गरज आहे, असे काँग्रेस नेते आणि माजी केंद्रीय मंत्री कपिल सिब्बल म्हणाले. तसेच आता पक्षाची आत्मचिंतनाची वेळ संपली असल्याचेही सिब्बल म्हणाले.