170 मुलांचा मृत्यू, 2 वर्ष, 2 हॉस्पीटल, UP आणि RJ सरकार, जाणून घ्या कधी काय झालं

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – उत्तर प्रदेश आणि राजस्थान ही देशातील दोन मोठी राज्ये आहेत. उत्तर प्रदेशमधील गोरखपूर आणि राजस्थानमधील कोटा. गोरखपूरमधील बीआरडी मेडिकल कॉलेज आणि कोटामधील जेके लोन हॉस्पिटल ही दोन्हीही सरकारी रुग्णालये. दोन्ही रुग्णालयात मुलांच्या उपचारासाठी येणे त्यांना खूप महागात पडल्याचे दिसून आले आहे. ऑगस्ट 2017 मध्ये बीआरडी मेडिकल कॉलेज आणि जेके लोन हॉस्पिटलने डिसेंबर – जानेवारी 2019-20 मध्ये काही दिवसांत बर्‍याच मुलांना आपले प्राण गमवावे लागले.

23-24 डिसेंबर रोजी राजस्थानच्या कोटामधील जेके लोन सरकारी रुग्णालयात 10 मुलांच्या मृत्यूनंतर नवजात मृत्यूची संख्या वाढत आहे. काही दिवसात एकामागोमाग 100 पेक्षा जास्त मुलांच्या मृत्यूने सुमारे 2 वर्षांपूर्वी बीआरडी मेडिकल कॉलेज, गोरखपूर येथे 5 दिवसात 60 पेक्षा जास्त मुलांच्या मृत्यूची भीषण आणि वेदनादायक घटनेची आठवण करून दिली.

29 महिन्यांनी पुन्हा मृत्यूचा तांडव
गोरखपूर येथे मुलांसाठी काळ ठरलेल्या ऑगस्ट महिन्यानंतरण 29 महिन्यांनी पुन्हा तोच काळ परत आल्यासारखे वाटते. गेल्या दहा – बारा दिवसांमध्ये सरकारी रुग्णालयात मुलांच्या मृत्यूचा तांडव काही थांबायचे नाव घेत नाही. आतापर्यंत 104 मुलांचा मृत्यू झालेला आहे. मुलांच्या मृत्यूमुळे राजस्थानातील राजकारण देखील तापायला लागले आहे.

2 वर्षांपूर्वी गोरखपूरमध्ये जेव्हा मुलांच्या मृत्यूची घटना घडली तेव्हा राज्यात भारतीय जनता पक्षाचे सरकार होते आणि कॉंग्रेससह अनेक राजकीय पक्षांनी या घटनेबद्दल भाजपा सरकारवर जोरदार टीका केली होती, परंतु मृत्यूची ही घटना राजस्थानमधील कॉंग्रेस राजात घडली. गहलोत सरकारविरोधात भाजप निषेध करीत असून मुख्यमंत्र्यांनी राजीनामा देण्याची मागणी करत आहेत.

CAA वरून लक्ष हटवण्याचा प्रयत्न : गहलोत
सध्या सीएए वरून देशभर आंदोलने होत आहेत आणि केवळ त्यावरून लक्ष हटवण्यासाठी हा आरोप केला जात असल्याचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी सांगितले. तसेच गेल्या काही वर्षांच्या तुलनेत या वर्षी कमी बालकांचा मृत्यू झाला असल्याचे देखील गहलोत यांनी सांगितले. मात्र विरोधी पक्षाने गहलोत यांच्याकडे राजीनाम्याची मागणी केली आहे.

गोरखपूर : पाच दिवसात 64 मृत्यू
2017 मध्ये अवघ्या पाच दिवसात 64 जणांचे मृत्यू झाले होते. त्यानंतर 12 ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सांगितले होते की, ऑक्सिजनच्या कमीमुळे हा सर्व प्रकार घडला आहे तसेच यातील दोषींवर नक्की कारवाई केली जाईल असे देखील ते यावेळी म्हणाले होते.

तत्कालीन मुख्यमंत्री योगी यांनी दिलेल्या आकडेवारीनुसार 7 ऑगस्ट ते 11 ऑगस्ट 2017 पर्यंत एकूण 64 मुलांचा मृत्यू झाला. 7 ऑगस्टला 9, 8 ऑगस्टला 12, 9 ऑगस्टला 9, 10 ऑगस्टला 23 आणि 11 ऑगस्ट रोजी 11 मुलांचा मृत्यू झाला. तथापि, त्यानंतर 12 ऑगस्ट रोजी 7 आणि 13 ऑगस्ट रोजी 6 मुलांचा मृत्यू झाला. गोरखपूरमधील काही दिवसातच या सर्वात मोठ्या रुग्णालयात 75 हून अधिक मुलांचा मृत्यू झाला होता.

ऑक्सीजनच्या कमी मुळे मृत्यू
याप्रकरणी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले होते की बीआरडी मेडिकल कॉलेजमध्ये मुलांचा मृत्यू हॉस्पिटलच्या अंतर्गत राजकारणामुळे झाला, ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे नव्हे. 23 ऑगस्ट 2017 रोजी मुख्य सचिवांच्या चौकशी अहवालात ऑक्सिजनच्या संकटाचा उल्लेख नाही.

प्रत्येक वर्षी ऑगस्ट महिन्यात मुलांचा मृत्यू : आरोग्य मंत्री
बीआरडी मेडिकल कॉलेजमध्ये 5 दिवसांत 63 मुलांच्या मृत्यूनंतर घटनेची माहिती घेण्यासाठी आलेल्या राज्याचे आरोग्यमंत्री सिद्धार्थनाथ सिंह म्हणाले होते की, दरवर्षी ऑगस्टमध्ये मुले मरण पावतात. नाजूक मुले रुग्णालयात दाखल होतात. 2014 मध्ये 567 मुले मरण पावली. मुख्यमंत्र्यांच्या भेटीदरम्यान गॅस पुरवठ्याबाबत कोणतीही चर्चा झाली नाही. वेगवेगळ्या कारणांमुळे मुले मरण पावली. गॅस अभावी मुले मरत नाहीत.

एवढेच नाही तर योगी आदित्यनाथ यांनी मुलांच्या मृत्यूसाठी अस्वच्छतेला देखील जबाबदार धरले आहे. दोनीही रुग्णालयातील मृत्यूची आकडेवारी 200 पर्यंत जाते. प्रशासन जोपर्यंत यावर काळजीपूर्वक दखल घेत नाही तोपर्यंत अशा घटना कोठूनही ऐकायला मिळतील.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/